फटाक्यांच्या धुराच्या त्रासामुळे ८ श्‍वान, तर २३ पक्षी घायाळ !

मुंबईतील प्रकार !

मुंबई – दिवाळीच्या ४ दिवसांत मुंबई आणि तेथील परिसरात फटाक्यांच्या धुराचा त्रास झाल्याने, तसेच भाजल्याने ८ श्‍वान, तर २३ पक्षी घायाळ झाले आहेत. (याला उत्तरदायी असणार्‍यांना खडसवायला हवे ! – संपादक) गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्राणी आणि पक्षी घायाळ होण्याच्या घटना काही प्रमाणात उणावल्या आहेत.

श्‍वसनाचा त्रास होऊन घायाळ झालेल्यांमध्ये १५ कबुतरे, ६ घारी आणि २ घुबड यांचा समावेश आहे. काही श्‍वानांच्या पाठीवर फटाके फोडण्यात आले. (ही आहे मानवाची संवेदनशून्यता ! – संपादक) त्या श्‍वानांना भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात भरती करावे लागले. किरकोळ घायाळ झालेले पक्षी आणि श्‍वान यांच्यावर उपचार करून त्यांना सोडण्यात आले, अशी माहिती परळ येथील ‘दी बाई साकरबाई दिनशॉ पेटिट हॉस्पिटल फॉर अ‍ॅनिमल’ रुग्णालयाचे (बैलघोडा रुग्णालय) व्यवस्थापक डॉ. मयूर डांगर यांनी दिली.

संपादकीय भूमिका

  • फटक्यांच्या धुराच्या त्रासामुळे जर प्राण्यांना इतका त्रास होतो, तर बकरी ईदच्या दिवशी देशभरात कोट्यवधी प्राण्यांचा बळी दिला जातो, त्याविषयी कुणीच का बोलत नाही ? त्या वेळेची आकडेवारी का जाहीर केली जात नाही ?
  • फटाक्यांमुळे वायूप्रदूषण होते, तसेच त्याच्या आवाजामुळे मुके प्राणी घाबरतात, हे लक्षात घेऊन तरी फटाके फोडणे टाळायला हवे !