बांगलादेश : गेल्या ८५ वर्षांत हिंदूंची लोकसंख्या ७५ टक्क्यांनी घटली !

हिंदू क्षीण होत चाललेला इस्लामी बांगलादेश ! (भाग १)

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनेच सर्वत्रच्या हिंदूंचे हित साधले जाईल. त्यामुळे हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता आहे; परंतु आज स्थिती अशी आहे की, केवळ बांगलादेश आणि पाकिस्तान येथीलच नाही, तर भारतातील हिंदूंचेही मुळात रक्षण होणे अत्यंत आवश्यक झाले आहे. त्या दृष्टीकोनातून ‘हिंदू क्षीण होत चाललेला इस्लामी बांगलादेश’, या नावाने ‘सनातन प्रभात’चे हे विशेष सदर चालू करत आहोत. यातून भारतातील हिंदूंनी जागृत होऊन ‘हिंदूरक्षण’ करण्यास सिद्ध व्हावे, ही अपेक्षा !

बांगलादेशातील हिंदूंच्या नरसंहाराचे प्रातिनिधिक छायाचित्र

गेल्या साधारण ८० वर्षांमध्ये बांगलादेश या इस्लामी राष्ट्रातील हिंदूंच्या संख्येमध्ये घट झाल्याविषयी आम्हाला आश्चर्य वाटते. बांगलादेशातील एकूण लोकसंख्येपैकी हिंदू लोकसंख्येची सरासरी पुढीलप्रमाणे आहे :

वर्ष १९४१ : २८ टक्के

वर्ष १९५१ : २२ टक्के

वर्ष १९६१ : १८.५ टक्के

वर्ष १९७१ : १३.५ टक्के *

वर्ष २०२२ : ७.९५ टक्के

(* : पूर्व पाकिस्तानचे रूपांतर बांगलादेशात झाल्यानंतर)

थोडक्यात वरील टक्केवारीवरून लक्षात येते की, गेल्या साधारण ८५ वर्षांत बांगलादेशातील हिंदूंची लोकसंख्या तब्बल ७५ टक्क्यांनी न्यून झाली आहे.

या मागील खरे कारण काय आहे, ते तुम्हाला ठाऊक आहे का ? बांगलादेशातील प्रत्येक राजकीय पक्षातील बुद्धीमान लोकांची, मग ते कोणत्याही विचारसरणीचे असोत, दोन समान वैशिष्ट्ये आहेत :

पहिले – ब्रिटीश काळापासून असलेली अविभाजित बंगालमधील हिंदूंची समाजातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रगती नि वर्चस्व क्षीण झाले पाहिजे, हा विचार.

दुसरे – व्यवसाय, शिक्षण, वैद्यकीय, कायदा आणि वाणिज्य, उद्योग इत्यादी क्षेत्रांमध्ये हिंदूंचे वर्चस्व पालटून सामाजिक अन् आर्थिक क्षेत्रांमध्ये बंगालमधील मुसलमानांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न !

यामुळेच बांगलादेशामधील हिंदूंची भयानक हत्याकांडे झाली आणि आजही अव्याहतपणे घडत आहेत.

दुसरीकडे भारतातील जनतेत ८० टक्के लोकसंख्या हिंदूंची असूनही येथील अनेक भाग भारतविरोधी झालेले आहेत. पुढे या भागांमध्येही बांगलादेशासारखा रक्तपात घडून येण्याची दाट शक्यता कोण नाकारेल ? यातून या क्षेत्रांचे इस्लामीकरण होऊन वेगळ्या देशांची मागणी झाल्यास त्याला उत्तरदायी कोण असेल ? हे लक्षात घेऊन हिंदूंनो, आताच जागे व्हा, अन्यथा धर्मांतर करण्यास किंवा मरण्यास सिद्ध व्हा, एवढेच !

बांगलादेशातील बहुसंख्यांक मुसलमानांचा अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंकडे पहाण्याचा दृष्टीकोन !

१. हिंदूंप्रतीचा दृष्टीकोन हा इस्लामी शिकवणीतून प्रेरित !

बांगलादेशात अल्पसंख्यांकांविषयी विशेषकरून हिंदूंविषयीचा दृष्टीकोन हा इस्लामच्या सिद्धांतांवरून ठरवला गेला आहे. कुराणमध्ये कोणतीही चूक असूच शकत नाही, हेच नेहमी उद्धृत केले जाऊन इतर धर्मांवर इस्लामचे वर्चस्व आहे, तो अन्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, असेच पाहिले गेले. धर्माव्यतिरिक्त मुसलमानांचे आर्थिक आणि सामाजिक अनुभव हेही त्यांचा अन्य धर्मियांविषयीचा दृष्टीकोन निर्धारित करण्यात भूमिका बजावतो; परंतु इस्लामची शिकवण सर्वच मुसलमानांना समान दिली गेल्याने त्याचा पगडा त्यांच्या मनावर अधिक आहे.

२. स्थलांतर आणि वैचारिक पालट !

फाळणीच्या वेळी बंगालमधील हिंदू निर्वासित झाल्याने त्यांनी बंगालमध्ये स्थलांतर केले आणि राष्ट्रीय नेते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वामी विवेकानंद यांच्या नावाने स्थापन झालेल्या वसाहतींमध्ये ते राहू लागले. कालांतराने देशभक्तीचा प्रभाव न्यून होऊन त्यांनी साम्यवाद्यांची विचारसरणी अनुसरली. याउलट बांगलादेशामधील स्वतःला मवाळ समजणारा मुसलमान समाज पालटून जहाल इस्लामकडे वळला.

३. अल्पसंख्यांकांना करावा लागला भेदभावाचा सामना !

बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्यांक विशेषतः हिंदू यांना राजकीय अस्थिरतेच्या वेळी नेहमी हिंसाचार आणि भेदभाव यांना सामोरे जावे लागले. पुराणमतवादी इस्लामी गटांच्या वाढत्या प्रभावामुळे असहिष्णुतेची ठिणगी पडली आणि अल्पसंख्यांक हे इस्लामच्या अस्तित्वाला धोकादायक आहेत, असे चित्र निर्माण करण्यात आले.

४. वाढत असलेल्या इस्लामी प्रभावाला राजकारणाची झालर !

बांगलादेशाच्या राजकारणामध्ये इस्लामचा प्रभाव काही नवीन नाही. बांगलादेश मुसलमानबहुल राष्ट्र असल्याने राजकारणाच्या क्षेत्रामध्ये इस्लामी तत्त्वांचा समावेश हे नैसर्गिकपणे हळहळू होत आहे. यामुळे अल्पसंख्यांकांना देण्यात येणारा दर्जा आणि वागणूक यांवर परिणाम होत आहे.

भारतीय हिंदूंनो, ‘इस्लाम’ नावाची राजकीय विचारसरणी अशा प्रकारे तुम्हाला गेली १ सहस्र ४०० वर्षे लक्ष्य करत आहे. त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंच्या दुर्दशेकडे दुर्लक्ष करू नका, असे आम्ही आपणास आवाहन करतो. अन्यथा तुम्हालाही लवकरच अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागेल, हे विसरू नका !

साभार

१. ‘हिंदु डिक्रिसेंट (बांगलादेश आणि पश्चिम बंगाल)’, लेखक : बिमल प्रामाणिक, सेंटर फॉर रिसर्च इन इंडिया-बांगलादेश रिलेशन्स, कोलकाता (२०२१)

२. बांगलादेश ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स

३. द इमर्जन्स ऑफ बांगलादेश – मेघना गुहठाकुर्ता

४. स्टेट ऑफ मायनॉरिटीज इन बांगलादेश : फ्रॉम सेक्युलर टू इस्लामिक हेगेमनी – सलीम समाद

(पुढील भागात वाचा : वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशातील केवळ एका जिल्ह्यातील हिंदु नरसंहाराच्या ७९ घटना – एक दृष्टीक्षेप !)