हिंदू क्षीण होत चाललेला इस्लामी बांगलादेश ! (भाग २)
भाग १. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/850373.html
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनेच सर्वत्रच्या हिंदूंचे हित साधले जाईल. त्यामुळे हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता आहे; परंतु आज स्थिती अशी आहे की, केवळ बांगलादेश आणि पाकिस्तान येथीलच नाही, तर भारतातील हिंदूंचेही मुळात रक्षण होणे अत्यंत आवश्यक झाले आहे. त्या दृष्टीकोनातून ‘हिंदू क्षीण होत चाललेला इस्लामी बांगलादेश’ या नावाने ‘सनातन प्रभात’चे हे विशेष सदर चालू करत आहोत. यातून भारतातील हिंदूंनी जागृत होऊन ‘हिंदूरक्षण’ करण्यास सिद्ध व्हावे, ही अपेक्षा !
वर्ष १९७१ च्या हिंदु नरसंहाराचा परिणाम : हिंदूंची संख्या तब्बल २७ टक्क्यांनी घटली !
वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहाराचा विचार करतांना पुढील ३ सूत्रे लक्षात घेणे आवश्यक आहे –
१. आतापर्यंतच्या मानवी इतिहासात हे भयानक आणि क्रूर नरसंहाराचे सत्र होते.
२. सर्वत्र पसरलेल्या आणि अस्ताव्यस्तपणे झालेल्या गोंधळात पूर्व पाकिस्तानमध्ये हिंदूंचा समूळ नाश करण्यात आला.
३. वर्ष १९६१ मध्ये १८.५ टक्के असलेली हिंदूंची संख्या वर्ष १९७४ मध्ये १३.५ टक्के झाली, म्हणजे केवळ १३ वर्षांत ती तब्बल २७ टक्क्यांनी घटली.
तत्कालीन पूर्व पाकिस्तान हा मुख्य पाकिस्तानातून वर्ष १९७१ मध्ये मुक्त झाला आणि त्याला ‘बांगलादेश’ हे नाव प्राप्त झाले. याला ‘बांगलादेश मुक्ती संग्राम’ या नावाने ओळखले जाते. ज्याप्रमाणे ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशाच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र देऊन बांगलादेशातून त्यांना पलायन करावे लागले आणि त्यानंतर हिंदूंच्या विरुद्ध २ सहस्रांहून अधिक देशव्यापी आक्रमणे झाली, त्याच्याहून कैकपटींनी भयावह स्थिती वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशातील हिंदूंनी भोगली. येथे आम्ही बांगलादेशातील केवळ खुलना जिल्ह्यातीलच त्या कालावधीत झालेल्या हिंदूंच्या हत्यांकाडांचा उल्लेख केला आहे. तशा तर तेथे नरसंहाराच्या शेकडो घटना घडल्या; परंतु त्यातील ७९ प्रमुख घटनांचा उल्लेख येथे करत आहोत. यांपैकी या लेखात केवळ तत्कालीन खुलना जिल्ह्याच्या घटनांचा उल्लेख केला आहे.
खुलना जिल्ह्यातील प्रमुख हत्याकांडे
१. चुकनगर हत्याकांड
२. बडमतला हत्याकांड
३. बरौरिया हत्याकांड
४. गजालिया हत्याकांड
५. चक्राखाली हत्याकांड
६. चलना बाजार हत्याकांड
७. बाजना हत्याकांड
८. चुनकुरी/ साहेबराबाद हत्याकांड
९. खार्निया खेया घाट हत्याकांड
१०. शाहपूर बाजार हत्याकांड
११. बरूना बाजार हत्याकांड
१२. चेचुरी हत्याकांड
१३. शोलगातिया खेया घाट हत्याकांड
१४. रंगपूर (दुमुरिया) हत्याकांड
१५. शलुआ बाजार हत्याकांड
१६. थुक्रा बाजार हत्याकांड
१७. पिपरेल चराबती हत्याकांड
१८. फुलतला ‘सीईओ ऑफिस’ हत्याकांड
१९. फुलतला बाजार हत्याकांड
२०. सचियादाह बाजार हत्याकांड
२१. अजगरा हत्याकांड
२२. पनखाली खेया घाट हत्याकांड
२३. देवारा हत्याकांड
२४. बराकपूर हत्याकांड
२५. शिलेमानपूर हत्याकांड
२६. कपिलमुनी बाजार हत्याकांड
२७. पैकगच्चा बाजार हत्याकांड
२८. गल्लामारी हत्याकांड
२९. सेनेर बाजार हत्याकांड
३०. बहिर्दिया हत्याकांड
३१. अल्तापोल रस्ता (खुलना शहर) हत्याकांड
३२. खुलना रेल्वे आणि रेल्वेस्थानक हत्याकांड
३३. रेल कॉलनी हत्याकांड
३४. खुलना सर्किट हाऊस हत्याकांड
३५. फॉरेस्ट घाट हत्याकांड
३६. कस्टम्स घाट हत्याकांड
३७. रेल्वे बॉईज स्कूल हत्याकांड
३८. चरेरहाट हत्याकांड
३९. रायेर नहल हत्याकांड
४०. न्यूजप्रिट मिल हत्याकांड
४१. क्रेसेंट ज्यूट मिल हत्याकांड
४२. प्लॅटिनम ज्यूट मिल हत्याकांड
४३. पीपल्स ज्यूट मिल हत्याकांड
४४. खालिशपूर हत्याकांड
४५. दौलतपूर बाजार हत्याकांड
४६. अरोंघट्टा कपालीपारा हत्याकांड
४७. महेश्वरपाशा हत्याकांड
४८. नसू खार्नेस ब्रिकफिल्ड हत्याकांड
४९. हड्डा हत्याकांड
सातखिडा जिल्ह्यातील (तत्कालीन खुलना जिल्ह्यातील एक भाग) प्रमुख हत्याकांडे
५०. सातखिडा टाऊन हायस्कूल हत्याकांड
५१. झावडंगा हत्याकांड
५२. घोणा ग्राम हत्याकांड
५३. श्रीरामपूर हत्याकांड
५४. मुरारीकाटी पालपारा हत्याकांड
५५. बागांचरा बाजार हत्याकांड
५६. परकुमिरा हत्याकांड
५७. राडीपारा प्रायमरी स्कूल हत्याकांड
५८. हरींखोला आणि गोलपोटा हत्याकांड
५९. जलालपूर हत्याकांड
६०. हादीपूर घोसपारा हत्याकांड
६१. परूलिया पूल हत्याकांड
६२. बारादल बाजार हत्याकांड
६३. रतनपूर हत्याकांड
६४. हरिनगर हत्याकांड
६५. पटकेलघाटा हत्याकांड
६६. कोलारोआ बाजार हत्याकांड
बगेरहाट जिल्ह्यातील (तत्कालीन खुलना जिल्ह्यातील एक भाग) हत्याकांडे
६७. डाकरा हत्याकांड
६८. शाखारीकाटी हत्याकांड
६९. अमलापारा पी.डब्ल्यू.डी. कॉलनी हत्याकांड
७०. दारातना खेया घाट हत्याकांड
७१. बगेरहाट बाजार खेया घाट हत्याकांड
७२. कंदीरपार हत्याकांड
७३. मनसा कालीबारी आणि बाजार हत्याकांड
७४. फकीरहाट बाजार हत्याकांड
७५. जत्रापूर हत्याकांड
७६. बाधल हत्याकांड
७७. मोरेलगोंज हत्याकांड
७८. चितलमारी हत्याकांड
७९. बासबती हत्याकांड
या घटनांखेरीजही खुलना जिल्ह्यात अशा अनेक घटना घडल्या, ज्यांमध्ये हिंदू प्राणरक्षणार्थ भारतात जाण्याच्या प्रयत्नांत असतांना रस्त्यात त्यांना अडवून अथवा साहाय्य शिबिरांमध्ये विश्रांती घेत असतांना त्यांना गाठून मारले, तसेच हिंदु महिलांवर बलात्कार करण्यात आले. या घटना कायमच्या दुर्लक्षित राहिल्या.
या लेखातील ७९ हत्याकांडे बांगलादेशातील केवळ एका जिल्ह्यातील आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. यातून वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशात झालेल्या हिंदूंच्या नरसंहाराची व्याप्ती जिवाचा थरकाप उडवणारी होती, हेच लक्षात येईल.
साभार : ‘हिंदु डिक्रिसेंट (बांगलादेश आणि पश्चिम बंगाल)’
लेखक : बिमल प्रामाणिक, ‘सेंटर फॉर रिसर्च इन इंडिया-बांगलादेश रिलेशन्स’, कोलकाता (वर्ष २०२१)
(पुढील भागात वाचा : वर्ष १९७१ मधील चुकनगर हत्याकांड : ३ तासांत १२ सहस्र हिंदू ठार !)
भाग ३. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/851241.html