४ जणांना अटक करून भ्रमणभाष संच जप्त
नवी देहली – फ्रान्सचे भारतातील राजदूत थियरी मॅथाऊ यांचा भ्रमणभाष संच चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २० ऑक्टोबर या दिवशी देहलीच्या चांदणी चौक परिसरात असलेल्या जैन मंदिराजवळ घडली. याप्रकरणी चांदणी चौक पोलिसांनी ४ जणांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून भ्रमणभाष संचही जप्त करण्यात आला आहे. (सर्वसामान्य व्यक्तीचे भ्रमणभाष इतक्या तत्परतेने का शोधले जात नाहीत ? पोलिसांना ते का सापडत नाहीत ? – संपादक)
संपादकीय भूमिकाहे पोलिसांना लज्जास्पद ! |