सांगली, २९ ऑक्टोबर (वार्ता.) – काँग्रेस पक्षाने काँग्रेसच्या नेत्या श्रीमती जयश्री पाटील यांना विधानसभेची उमेदवारी न दिल्यामुळे त्या आणि त्यांचे कार्यकर्ते अप्रसन्न झाले. पाटील यांनी त्यामुळे अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी आवेदन २८ ऑक्टोबर या दिवशी प्रविष्ट केले आहे. कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून मी अपक्ष आवेदन भरण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.
वसंतदादा पाटील घराण्यात उमेदवारीवरून फुटीचे ग्रहण !
गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय क्षेत्रात एकेकाळी प्रबळ असलेल्या येथील राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या घराण्यात विधानसभा उमेदवारीवरून पुन्हा एकदा फुटीचे ग्रहण लागले आहे.