लंडनमध्ये दिवाळीच्या कार्यक्रमावरून वर्णद्वेषी घोषणा
लंडन (ब्रिटन) – लंडनचे महापौर सादिक खान यांनी २७ ऑक्टोबरला दिवाळीचा कार्यक्रम असल्याचे घोषित केल्यानंतर भारतियांना लक्ष्य करून ‘भारतात परत जा, भारतियांनी प्रत्येक देशाचा नाश केला’ अशी वर्णद्वेषी घोषणा देण्यात आली. अशी घोषणा देणार्यांची ओळख पटू शकली नाही.
‘Go back to India, Indians have destroyed every country they visit !’ – Racist slogans from a Diwali event in London
If the protestors are British then such slogans are not surprising because they have always been and looks like they will continue to be racist !… pic.twitter.com/113rTOSkTo
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 27, 2024
लंडनमध्ये एकूण लोकसंख्येपैकी अनुमाने ७.५ टक्के भारतीय आहेत. त्यामुळे लंडनचे महापौर सादिक खान यांनी इंस्टाग्रामवर २७ ऑक्टोबर रोजी ट्रफलगर स्क्वेअरमध्ये दिवाळीचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली. त्या संदर्भातील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित केला. तसेच या कार्यक्रमासाठी सर्वांना आमंत्रित करण्यात आले होते. या व्हिडिओमध्ये सादिक खान यांनी भारतियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या कार्यक्रमाच्या घोषणेनंतर या व्हिडिओवर वर्णद्वेषी टीका करून भारतियांना लक्ष्य करण्यात आले.
संपादकीय भूमिकाजर विरोध करणारे ब्रिटीश असतील, तर ते पूर्वीपासूनच वर्णद्वेषी आहेत आणि अजूनही त्यांच्यात काहीच पालट झालेला नाही, हे पुन्हा लक्षात येते ! |