|
नवी देहली – येथील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठामध्ये २२ ऑक्टोबरच्या सायंकाळी हिंदु विद्यार्थ्यांकडून दिवाळी साजरी केली जात असतांना मुसलमान विद्यार्थ्यांनी त्याला विरोध केल्याने मोठा वाद झाला. या वेळी मुसलमान विद्यार्थ्यांनी येथे लावण्यात आलेले दिवे लाथेने उडवून दिले, तसेच रांगोळी पुसण्यात आली. त्यांच्याकडून ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) ‘नारा-ए-तकबीर’ (अल्ला सर्वांत मोठा आहे), ‘पॅलेस्टाईन झिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारीही झाली. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनांचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. अद्याप या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आल्याची कुठलीही माहिती समोर आलेली नाही. सध्या येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Mu$|!m students in Delhi’s Jamia Millia Islamia University prevent the celebration of #Diwali!
Lamps were kicked over, and rangoli was erased; Hindu students assaulted.
Mu$|!m students threatened Hindu girls, saying, “Wear a hijab, or we will rape you”; the administration… pic.twitter.com/bMyvz3GDkE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 23, 2024
‘हिजाब घाला, नाहीतर बलात्कार करू’, अशी मुसलमान विद्यार्थ्यांनी हिंदु विद्यार्थिंनींना दिली धमकी
प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, मुसलमान विद्यार्थ्यांनी दिवाळीला विरोध करतांना हिंदु विद्यार्थिनींना म्हटले की, तुम्ही हिजाब (मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) घाला, नाहीतर आम्ही तुमच्यावर बलात्कार करू. त्यांनीच दिवे लाथेने उडवून लावले, तर रांगोळी पुसून टाकली.
प्रशासनाने मौन बाळगले होते ! – विद्यार्थ्यांचा आरोप
जेव्हा विद्यापिठाच्या परिसरात गदारोळ चालू झाला, तेव्हा विद्यापिठाचे मुख्य अधिकार्यांसह अनेक अधिकारी उपस्थित होते; मात्र त्यांनी विद्यार्थ्यांना थांबवले नाही, असा आरोप संतप्त हिंदु विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थी घायाळ होत असतांनाही विद्यापिठाने मौन बाळगले.
संपादकीय भूमिका
|