Muslims Oppose Unnav Temple Renovation :  उन्नाव (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल गावात हिंदूंना मंदिराचे छत बांधण्यापासून रोखले

  • ३२ जणांना अटक

  • हिंदूंनी अनुमती घेऊन बांधकाम करावे ! – प्रशासन

उन्नाव (उत्तरप्रदेश) – येथील मुसलमानबहुल राणीपूर गावात असलेल्या शिवमंदिराच्या छताचे बांधकाम थांबवण्याचा प्रयत्न इस्लामी कट्टरवाद्यांनी केला. या गावात निहाल, अनीस खान, असगर खान, शोएब, सलीम, युनूस, अच्छे आणि रईस या स्थानिक मुसलमानांचे म्हणणे आहे की, मंदिराच्या बांधकामामुळे मशिदीतील नमाजपठणाच्या वेळी अडथळा निर्माण होईल; कारण या मंदिरापासून मशीद केवळ १०० मीटर अंतरावर आहे.

१. राणीपूर गावात १२५ हून अधिक मुसलमान कुटुंबे आणि केवळ २५ ते ३० हिंदु कुटुंबे रहातात. या गावात ७० वर्षांहून अधिक जुने शिवमंदिर आहे. मंदिराच्या चहूबाजूंनी भिंती आणि खांब आहेत; परंतु छत टाकण्याचे काम अद्याप शेष आहे. याला मुसलमानांनी विरोध केला आहे. हा वाद ७ आणि ८ ऑक्टोबर २०२४ या दिवशी झाल्यानंतर पोलिसांनी २६ मुसलमान अन् ६ हिंदू यांना अटक करण्यात आली. आता सामाजिक माध्यमांत हा वाद पुन्हा चालू झाला आहे.

२. येथील विभागीय अधिकारी ऋषिकांत शुक्ला यांचे म्हणणे आहे की, धार्मिक स्थळ बांधण्यापूर्वी प्रशासनाची अनुमती घ्यावी लागते. हिंदूंना प्रशासनाकडून अनुमती घेण्यास सांगण्यात आले आहे. प्रशासनाकडून अनुमती मिळाल्यास मंदिराचे बांधकाम पूर्ण करता येईल. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल उपविभागीय दंडाधिकार्‍यांकडे पाठवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

पाकिस्तान आणि बांगलादेश नाही, तर भारतात अन् तेही उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार असतांना धर्मांध मुसलमान असे धाडस करू शकतात, यावरून धर्मांध किती उद्दाम आहेत ? आणि हिंदूंची स्थिती किती दयनीय आहे ?, हे लक्षात येते ! ही स्थिती पालटण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणेच आवश्यक  आहे !