अर्जुनाने भगवंताला आपल्या बाजूला घेतले आणि त्यामुळे पांडवांचे जे समाधान टिकले, ते काही कौरवांचे टिकले नाही. पांडवांनी देहाने वनवास सोसला; पण मनाने त्यांनी भगवंताला भजल्यामुळे वनवासातही ते समाधानात राहिले. स्वतःची निष्ठा अशी बलवत्तर असावी की, तिच्यामुळे आपले समाधान राहील. राजा हरिश्चंद्र, प्रल्हाद वगैरे मोठमोठ्यांचा किती छळ झाला; पण त्यांची निष्ठा अतीबलवत्तर असल्याने ते त्या छळातून सुखरूप पार पडले. ‘जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते’, अशा खर्या भावनेने एक वर्षभर जो राहील, त्याला समाधान काय आहे, हे खात्रीने कळेल.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज