हिंदूंमध्ये शत्रूबोधाची कमतरता आहे. आगीमध्ये हात नकळत टाकला, तरी भाजतो. त्याप्रमाणे ‘घात करणे’, हाच शत्रूचा धर्म आहे. शत्रूबोध नसेल, तर ईश्वरही आपणावर कृपा करणार नाही. प्रभु श्रीरामाचा नामजप करत असूनही बिभीषणाला शत्रूबोध नव्हता. मारुतिरायाने लंकादहन करतांना बिभीषणाला शत्रूबोध करून सत्याचा पक्ष घेण्यास सांगितले. त्यामुळे बिभीषणाला प्रभु श्रीराम मिळाले. युद्धात डोळे बंद करून तलवार चालवण्याने काहीच साध्य होत नाही. झोपलेल्या हत्तीपेक्षा जिवंत मुंगी शक्तीशाली ठरते, त्याप्रमाणे हिंदूंनी शत्रूबोध घेऊन जागृत व्हावे.
– श्री. विनोद यादव, संस्थापक, ‘धर्मरक्षण संघटना’, भोपाळ, मध्यप्रदेश.