तुमचे कर्म महत्त्वाचे नाही, त्या कर्माच्या पाठीमागची भूमिका महत्त्वाची आहे. ती निरहंकारी आहे कि नाही ? ती अनासक्तीची आहे कि नाही ? ज्याच्यासाठी तुम्ही कर्म करता त्याच्या कल्याणाची आहे कि नाही ? यांवर तुमच्या कर्माचे स्वरूप अवलंबून असते.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ग्रंथ ‘कर्मसंन्यासयोग’)