सध्याच्या रुग्णांमध्ये ‘चिकनगुनिया’ची चाचणी नकारात्मक (निगेटिव्ह म्हणजे चिकुनगुन्या झालेला नसणे) आली असली, तरीही सगळी लक्षणे त्या आजाराची दिसत आहेत. ताप न येताच किंवा रुग्णाला तापाविषयी न कळताच काही दिवसांत सांधेदुखी, सांध्यांच्या ठिकाणी सूज, मुंग्या, आखडलेपणा, नाकावर डाग येणे, सकाळच्या वेळी वेदना अधिक येऊन दिवस पुढे सरकेल तशा वेदना न्यून होत जाणे, पुरळ येणे, अशा तक्रारी घेऊन रुग्ण येत आहेत.
यामध्ये मुख्यतः
१. कोरडा शेक (वैद्यकीय सल्ल्याने पानांनी/पोटली स्वेद)
२. डासांपासून बचाव
३. तापाचा विचार करून त्यावर आणि सांध्यांवर काम करणारे औषधी काढे अन् गोळ्या
४. खाण्यात आंबट, खारट, तिखट टाळणे
५. दिवसा झोपणे, थंड पाणी, थंड वार्याचा स्पर्श, एका जागी बसून लांब प्रवास हे सर्व टाळणे
६. सांध्याच्या थोड्या थोड्या हालचाली करत रहाणे
या गोष्टी केल्यास उत्तम लाभ होत आहे.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.c