बैरूत – १४ ऑक्टोबरला इस्रायलने उत्तर लेबनॉनवर हवाई आक्रमण केले. या आक्रमणात २१ लोक ठार झाले, तर ८ जण घायाळ झाले. दक्षिण लेबनॉनमधून पळून आलेले लोक उत्तर लेबनॉनमधील त्रिपोलीतील ऐतोऊ येथे एका सदनिकेमध्ये रहात होते. त्रिपोलीची गणना ‘लेबनॉनचा सुरक्षित भाग’ म्हणून केली जाते; मात्र इस्रायलने प्रथमच येथील निर्वासित छावणीवर बाँब फेकले. याआधी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले होते की, बैरूतसह ज्या भागांत हिजबुल्लाचे तळ आहेत, त्या प्रत्येक भागावर आक्रमण केले जाईल.
Israeli Strike Kills 21 in Lebanon 🚨
Retaliation for #Hezbollah drone attack on Israeli army base
PM Netanyahu vows to strike Hezbollah across #Lebanon#IsraelLebanonWar #IsraelHamasWar pic.twitter.com/ONvfxsGxQN
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 15, 2024
गाझामध्येही इस्रायलचे आक्रमण चालूच : २९ ठार
इस्रायलच्या सैन्याने नुकतेच दक्षिण गाझा येथील सलाह-अल-दीन मशिदीवर बाँब फेकले. यामध्ये २९ जणांचा मृत्यू झाला. इस्रायली सैन्याने सांगितले की, त्यांनी नागरिकांमध्ये लपलेल्या आतंकवाद्यांना लक्ष्य केले आहे.