१. ‘२.५.२०२४ या दिवशी माझी मुलगी चि.सौ.कां. सायली संजय जमदाडे हिचा शुभविवाह पुण्यातील त्रिमूर्ती सभागृहात झाला. त्या दिवशी अतिशय उष्मा असूनही सभागृहात थंडावा जाणवत होता.
२. सामान्यतः लग्नाच्या दिवशी सभागृहात पुष्कळ गडबडीचे वातावरण असते; पण त्या दिवशी तेथे पुष्कळ शांत वाटत होते.
३. जमलेल्या पाहुण्यांनाही ‘सभागृहातून बाहेर जाऊच नये’, असे वाटत होते.
४. ‘लग्नसोहळा प्रत्यक्ष स्वर्गातच होत आहे’, असे जाणवल्याचे काही पाहुण्यांनी सांगितले.
५. सभागृहाच्या बाहेर हिरवळीवर विवाह होत असतांना ‘चैतन्याचा स्रोत आकाशातून वधू-वरांच्या दिशेने येत आहे’, असे मला, तसेच माझे पती श्री. संजय जमदाडे आणि मुलगा अनिकेत यांना जाणवले.
६. ‘हा विवाह समारंभ उच्च लोकात चालू आहे’, असे सायलीला (माझ्या मुलीला) जाणवले.
७. आम्हाला विवाहस्थळी देवता आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांचे अस्तित्व जाणवले. ‘या सभागृहात २० वर्षांपूर्वी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा सत्संग झाला होता’, असे आम्हाला नंतर समजले.
‘हे सर्व केवळ सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची कृपा आणि सर्व संतांचे आशीर्वाद यांमुळे अनुभवता आले’, याबद्दल मला त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
– सौ. अनिता संजय जमदाडे, डोंबिवली (पूर्व), जिल्हा ठाणे. (५.६.२०२४)
|