देवता आणि गुरु यांच्याविषयी ओढ असलेला पनवेल (रायगड) येथील चि. श्लोक गोगटे (वय २ वर्षे ) !

आश्विन शुक्ल एकादशी (१४ .१० .२०२४ ) या दिवशी पनवेल (रायगड) येथील चि. श्लोक गोगटे याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आजीला जाणवलेली त्याची वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.  

चि. श्लोक गोगटे याला दुसऱ्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवरकडून अनेक शुभशीर्वाद !

चि. श्लोक गोगटे

१. जन्मापूर्वी  

‘चि. श्लोकची आई सौ. समृद्धी निखिल गोगटे हिला गर्भारपणात कार्यालयाची (ऑफिसची) रात्रपाळी असायची. तेव्हा ती रात्रभर काम करतांना भ्रमणमाषवर ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा  नामजप ऐकायची.

२. जन्म ते १ वर्ष

१. आठ दिवसांनंतर बाळाला जवळ घेतल्यावर ‘श्री गुरुदेव दत्त।’ हा नामजप म्हटल्यावर श्लोक मान वळवून बघायचा.

२. जन्मानंतर चि. श्लोक याची पत्रिका केल्यावर त्याला गुरुजींनी हनुमानाची उपासना करायला सांगितली; म्हणून आम्ही घरात नेहमी हनुमान स्तोत्र, वडवानल स्तोत्र, तसेच हनुमानाचा नामजप लावायचो.

३. श्लोक १ मासाचा असतांना पनवेलमध्ये सार्वजनिक सभा होती. तेव्हा साधक घरी यायचे. त्या वेळी मी त्याला ‘साधक, म्हणजे परम पूज्य गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) आले आहेत’, असे सांगायचे. तेव्हा त्याच्या चेहर्‍यावरचे भाव वेगळेच जाणवायचे.

३. एक वर्ष ते दीड वर्ष

सौ. विद्या विलास गोगटे

१. श्लोक सव्वा वर्षाचा झाल्यावर चालायला, तसेच बोलायलाही लागला. प्रतिदिन संध्याकाळी बाहेरून आल्यावर हात पाय धुतले की, लगेच तो ‘बाप्पा बाप्पा’ करायचा आणि देवासमोर दिवा लावेपर्यंत तेथेच उभा रहायचा.

२. झोपतांना श्लोक रडत असेल, तर ‘दत्त दत्त’ म्हटल्यावर तो शांत होत असे. आता तो झोपतांना त्याचे आजोबा किंवा त्याचे वडील यांना ‘दत्त दत्त’, असे म्हणायला सांगतो.

३. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये असलेले परात्पर गुरुदेवांचे चित्र एकदा त्याला दाखवले होते. त्यामुळे श्लोकचे आजोबा (श्री. विलास लक्ष्मण गोगटे) यांनी सकाळी दुधासमवेत आणलेले दैनिक पिशवीतून काढल्याबरोबर तो ‘बाप्पा’ म्हणायचा. ‘डॉक्टर आजोबांचे चित्र कुठे आहे ?’, असे विचारल्यावर दैनिक ‘सनातन प्रभात’मधील त्यांच्या छायाचित्रावर बोट ठेवून दाखवायचा.

४. दीड वर्ष ते दोन वर्षे

श्लोकची आजी (सौ. प्रतिभा महाजनी [आईची आई]) गीता पठण करते. गीतेतील १५ व्या अध्यायाची पहिली ओळ तो आजी समवेत म्हणतो.

‘हे गुरुदेवा, ‘अशा चैतन्यमय बाळाची कृष्ण म्हणून सेवा कशी करायची’, हे तुम्ही शिकवले आणि तशी सेवा करून घेत आहात’, यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. विद्या विलास गोगटे (चि. श्लोकची आजी [वडिलांची आई]), पनवेल, जिल्हा रायगड. (२७.९.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक