१. ‘हे आर्य, हे हिंदूंनो ! तुम्ही विसरू नका की, तुम्ही विश्वातील सर्वश्रेष्ठ, सर्वांत प्राचीन धर्माचे आहात, ज्या धर्माने संपूर्ण विश्वाला ‘जगा आणि जगू द्या’, हा संदेश सर्वप्रथम दिला. समानता, माणुसकी, सहजीवन यांसारखे मानवतेचे उच्च आदर्श दिले. आज जगामध्ये जी काही माणुसकी दिसते, तिचा मूळ स्रोत ‘हिंदूंच्या वेदांपासून मिळालेले ज्ञान’ हा आहे आणि तो हिंदूंच्या एकतेचा मुख्य आधारपण आहे.
२. हिंदूंना जर आपला धर्म, संस्कृती आणि देशाचे संरक्षण अन् संवर्धन हवे आहे, तर प्रत्येक हिंदूने धर्मरक्षणाचे व्रत घेऊन धर्मरक्षणाच्या कार्यांत हातभार लावावा; कारण सांप्रतस्थितीत धर्मरक्षणाचे दायित्व प्रत्येक हिंदूवर आहे. आम्हाला आमच्या अस्तित्वाची लढाई स्वतःच लढायची आहे. आमच्या पूर्वजांनी आपला धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी संघर्ष करून आम्हाला वाचवले आहे. संप्रदाय, राष्ट्र्रभाषा, मातृभाषा, जाती, उपजाती, क्षेत्र, प्रांत हे भेदभाव विसरून धर्मरक्षणाचा संकल्प करून रचनात्मक कार्यासाठी झोकून द्यावे. त्यातून समाजात एकजुटीची भावना वाढेल, राष्ट्रभक्ती जागृत होईल आणि राष्ट्रीय एकता अन् अखंडता सुरक्षित राहील.
३. ‘स्वार्थ, पद, मान-सन्मानाची प्रलोभने आणि आर्थिक लाभ यांचा त्याग करून भारतात समतावादी अन् मानवतावादी हिंदु राज्य स्थापित करण्यासाठी एकजुटीने कार्यरत होऊया ! भारतात ‘हिंदु राज्य’ स्थापन करणे, यासाठी आतापासून प्रयत्न केले नाहीत, तर नंतर ‘हिंदु राज्य’ येणे अतिशय कठीण होईल.’
(संदर्भ : ‘सावरकर टाइम्स’)