विष्णूच्या रूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची साधिकेने अनुभवलेली मानसपूजा 

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी

‘१७.७.२०२४ या दिवशी मी सकाळी ६ वाजता उठण्यापूर्वी मला पुढील दृश्य दिसले, ‘प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) शेषशय्येवर झोपलेले आहेत आणि त्यांच्या उजव्या बाजूला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् डाव्या बाजूला श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ उभ्या आहेत.’ त्या वेळी मी प.पू. भक्तराज महाराज यांचे भजन म्हणत होते. मला प.पू. गुरुदेवांच्या चरणांतून पांढरा प्रकाश बाहेर पडत आहे’, असे दिसू लागले. माझ्या मनात गुरुदेवांची (श्रीविष्णूची) मानसपूजा करण्याचा विचार आला. मी पूजेची सर्व सिद्धता करून प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा, ‘ही पूजा तुम्हीच माझ्याकडून करून घ्या.’ त्या वेळी ‘श्रीविष्णूच्या रूपात गुरुदेव माझ्यासमोर उभे आहेत’, असे मला दिसले. मी त्यांची पाद्यपूजा केली. नैवेद्यासाठी दूध आणि फळे ठेवली. हे सर्व करत असतांना माझ्या मनात विचार आला, ‘देवाला दही-पोह्यांचा नैवेद्य द्यावा.’ मी देवाच्या मुखाजवळ दही-पोह्यांची वाटी धरली. ‘देव ते पोहे ग्रहण करत आहे’, असे मला दिसले. तेथे मला श्री महालक्ष्मीदेवी आलेली दिसली आणि आशीर्वाद देणारा देवाचा हातही मला दिसला.

‘हे गुरुदेवा, ‘केवळ तुमच्या कृपेने मला मानसपूजेच्या माध्यमातून भावस्थिती अनुभवता आली. तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७४ वर्षे), फोंडा, गोवा. (१७.७.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक