हिंदु राष्ट्र एक शिवधनुष्य आहे. जसे रामायणात शिवधनुष्य उचलणे महाबली योद्ध्यांना शक्य झाले नाही, ते शिवधनुष्य श्रीरामाने खेळण्यासारखे उचलून मोडले. महाभारतातील युद्ध १८ वर्षे चालणार होते, ते युद्ध श्रीकृष्णाने अवघ्या १८ दिवसांत संपवले. तसेच उचित क्षण येताच या कलियुगात हिंदु राष्ट्र स्थापन करायला ईश्वराला वेळ लागणार नाही. यावर दृढ श्रद्धा ठेवून हिंदु राष्ट्रासाठी आपल्या सर्वांना निरंतर प्रयत्नरत रहावे लागणार आहेत. अयोध्येत नुकतेच श्री रामलल्ला विराजमान झाल्यानंतर देशाला आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. आता देशाला रामराज्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आधी जनतेला व्यक्तीगत जीवनात रामराज्य आणण्यासाठी साधना करावी लागेल, तसेच नैतिक आणि सदाचारी जीवन जगण्याचा संकल्प करावा लागेल. सात्त्विक समाजाच्या पुढाकारातूनच अध्यात्मावर आधारित राष्ट्ररचना, म्हणजेच रामराज्य शक्य आहे. त्यामुळे आपण सर्वांनी व्यक्तीगत आणि सामाजिक जीवनात रामराज्य आणण्याचा संकल्प करायला हवा !
– सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती.