सेवेची तळमळ असलेला ५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा कोची (केरळ) येथील कु. आकाश सिजू (वय १८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. आकाश सिजू  हा या पिढीतील आहे !

कु. आकाश सिजू
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

 ‘कु. आकाश सिजू कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रात सेवेसाठी येतो. तो ‘लाईव्ह’ सत्संगाची (सत्संगाचे संगणकीय प्रणालीद्वारे प्रसारण करणे) जोडणी करण्याची सेवा करत असतांना त्याची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. शिकण्याची वृत्ती

आकाश एका ओळखीच्या व्यक्तीच्या संगणक ‘सर्व्हिस सेंटर’मध्ये साहाय्यासाठी जातो, जेणेकरून तो सर्व शिकू शकतो. त्याने ‘सर्व्हिस सेंटर’च्या मालकाला ‘लाईव्ह सत्संगासाठी कोणते साहित्य लागेल ?’, याविषयी विचारून घेतले आणि साहित्य एकत्र केले. ही सेवा करण्याचे तांत्रिक ज्ञान कोची येथील सेवाकेंद्रात केवळ आकाशकडे आहे.

२. सेवेची तळमळ

कु. अदिती सुखठणकर

अ. तो गुरुपौर्णिमेच्या कालावधीत कुटुंबियांच्या समवेत तिरुपती येथे देवदर्शनाला गेला होता. त्याच्याकडे कोची येथील गुरुपौर्णिमा सोहळ्याचे ‘लाईव्ह’ प्रसारण करण्याचे दायित्व होते. त्याने तिरुपतीला जाण्याआधी सेवेसाठी लागणारे सर्व साहित्य एकत्र केले.

आ. तो तिरुपती येथून १९ जुलैला रात्री निघून २० जुलैला दुपारी कोची येथे पोचणार होता. त्यांना तिरुपती बालाजीचे दर्शन होण्यात अडचण येत होती. तेव्हा त्याने त्याच्या आईला सांगितले, ‘‘मला सेवेसाठी जाणे आवश्यक आहे. दर्शन घेण्यासाठी आपली रेल्वे चुकायला नको.’’ आकाशच्या तळमळीमुळे त्यांचे देवदर्शन वेळेत झाले आणि तो सेवेसाठी कोची येथे वेळेत पोचला.

इ. तो दूरचा प्रवास करून आला होता, तरीही त्याने विश्रांती न घेता सेवा केली.

ई. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी आकाशने सभागृहात ‘लाईव्ह’ प्रसारणासाठी चांगल्या पद्धतीने जोडणी केली.

उ. ‘लाईव्ह’ प्रसारण होतांना काही तांत्रिक अडचणी येत होत्या. तेव्हा त्याने शांत आणि स्थिर राहून अडचणी सोडवल्या.

३. काटकसरी

‘लाईव्ह’ प्रसारणासाठी लागणारा ‘प्रोजेक्टर’ (कार्यक्रमाचे प्रक्षेपण करणारे यंत्र) भाड्याने आणला होता. ‘प्रोजेक्टर’ आणणारी व्यक्ती कार्यक्रमाच्या ठिकाणी थांबणार होती. ती व्यक्ती तेथे थांबली, तर त्याला पैसे द्यावे लागले असते. तेव्हा आकाशने सांगितले, ‘‘तो प्रोजेक्टरसंबंधी सर्व गोष्टी पाहू शकतो.’’ आकाशने चांगली सेवा केल्यामुळे केरळ येथील गुरुपौर्णिमेचे प्रथमच ‘लाईव्ह’ प्रसारण झाले. ‘आकाशमधील गुण माझ्यात येण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होऊ देत’, अशी मी श्री गुरुचरणी प्रार्थना करते.’

– कु. अदिती सुखटणकर, केरळ (२८.७.२०२४)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या  https://goo.gl/06MJck  मार्गिकेवरही पाहू शकता.