दौंड (पुणे) येथे पॅलेस्टाईनचे ध्वज फडकावल्याच्या निषेधार्थ केडगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !
केडगाव (जिल्हा पुणे), २७ सप्टेंबर (वार्ता.) – हमासच्या आतंकवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून स्त्रियांवर बलात्कार केले, त्यांच्या हत्या केल्या आणि अनेक निष्पापांच्या हत्या केल्याा. हे सर्व हमासचे अतिरेकी हे पॅलेस्टाईनचे आश्रित आहेत. अशा लोकांच्या राष्ट्राचे ध्वज जर फडकावले जात असतील, तर त्यांचा उद्देश काय आहे ? याची सखोल चौकशी पोलिसांनी करावी. आता पोलिसांनी जी कारवाई केली आहे, ती केवळ ध्वज फडकावणार्यांवर केलेली आहे. आयोजकांवर केलेली नाही. संबंधितांवर खरेतर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे नोंद करणे आवश्यक आहे.
ध्वज फडकावण्यामागे त्यांचा उद्देश अराजकता माजवणे होता का ? याचेही सखोल अन्वेषण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचा’चे अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर यांनी केले. दौंड (पुणे) येथे पॅलेस्टाईनचे ध्वज फडकावल्याच्या निषेधार्थ केडगाव येथे हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने २६ सप्टेंबर या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी राष्ट्रविघातक कृत्यांविषयी निषेध व्यक्त करण्यात येऊन दोषींवर राष्ट्रद्रोहाची कारवाई करण्याची मागणी केली. या वेळी राष्ट्रद्रोही शक्तींच्या विरोधात आणि भारतमाता, हिंदु धर्माच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. निषेधाचे फलक दाखवून तिरंगा आणि भगवा ध्वज फडकावण्यात आला, तसेच पोलिसांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे समन्वयक सचिन घुले, ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, महादेव टकले, संदीप टेंगले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या आंदोलनाला युवा वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. १२५ हून अधिक धर्मप्रेमी या आंदोलनात सहभागी झाले होते.
प्रशासनाने स्वतः या प्रकरणात लक्ष घालून कारवाई करत नसल्यामुळे आंदोलन करण्याची वेळ येत आहे, असे मत समाजातील एका युवतीने व्यक्त केले.
निवेदनात केलेल्या मागण्या
दौंडमधील घटनेमागे काही षड्यंत्र आहे का ? याची चौकशी झाली पाहिजे. कार्यक्रमाचे आयोजक आणि आरोपींना अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा.
संपादकीय भूमिका :पॅलेस्टाईनचे ध्वज फडकावणार्या आयोजकांच्या मुसक्या आवळून त्यांना तत्परतेने कठोर शिक्षा झाली, तर देशद्रोही कृतींना आळा बसेल ! |