भारतात हिंदू अल्पसंख्य झाले तर ?

जो हिंदु, हिंदु धर्म मानत नाही, हिंदु धर्म आणि देवता यांची निंदानालस्ती करतो, तो म्हणजे निधर्मी !

‘आजच्या घडीला भारतात हिंदु समाज मोठ्या प्रमाणात शिक्षित झालेला आहे आणि २१ व्या शतकात तर ते प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अगदी आदिवासी, दलित इत्यादी मागास गणल्या गेलेल्या लोकांनाही शिक्षणाचे महत्त्व समजल्यामुळे त्या समाजातील लोक चिकाटीने शिक्षण प्राप्त करून प्रगती साधत आहेत. शिक्षणामुळे आर्थिक प्रगतीची दारे खुली होतात आणि सामाजिक दर्जाही उंचावतो. मिळवलेला दर्जा सांभाळायचा, तर प्रत्येक व्यक्तीला आर्थिक आणि कौटुंबिक नियोजन करावे लागते. कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसाठी त्याला धडपड करावी लागते. कुटुंबातील सदस्यांची संख्या मर्यादित राखण्याकरता कुटुंब नियोजनाचा मार्गही पत्करावा लागतो. असे असले, तरी सध्या ‘एकच मूल पुरे’ अथवा ‘मूलच नको’, अशा विचारापर्यंत पती-पत्नी येतात. अशा विचारांचा गंभीर परिणाम हिंदु कुटुंबव्यवस्थेवर होऊ लागलेला आहे. २७ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘घटती लोकसंख्या ही हिंदूंसमोरील मोठी समस्या, धर्माच्या नावाखाली वाढत असलेली इस्लामी लोकसंख्या आणि वर्ष २०४७ पर्यंत मुसलमान बहुसंख्य होणार ?’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग २)

मागील भाग येथे वाचा – https://sanatanprabhat.org/marathi/837885.html

४. जातीजातींत विभागलेला हिंदु समाज

श्री. गो.रा. ढवळीकर

अनुमाने १ सहस्र वर्षे मुसलमानांनी या देशावर राज्य केले. कत्तली, लुटालूट, मंदिरांचा विध्वंस, महिलांवर अत्याचार अशा अत्यंत क्रूर आणि घृणास्पद कृत्यांचा तो इतिहास आहे. हिंदूंच्या देशात हिंदू बहुसंख्य असूनही अल्पसंख्य मुसलमान राज्यकर्त्यांच्या अत्याचाराखाली सर्व प्रकारचे दुःख सहन करत सहस्रो वर्षे गुलामगिरीत राहिले. याचे कारण एकच, आताच्या प्रमाणेच स्वार्थी हिंदू लोकांची त्यांना साथ मिळाली. त्या वेळी हिंदू राष्ट्रप्रेमाने एकवटले असते, तर १ सहस्र काय, एक दिवससुद्धा त्यांना सत्तेत रहाता आले नसते. आजसुद्धा देशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहिली असता दिसून येते की, मुसलमान समाज १०० टक्के एकवटलेला आणि पूर्वीसारखाच आक्रमक झालेला असून तो भारतावर स्वतःची सत्ता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे. जातीजातींत विभागलेला हिंदु समाज पूर्वीप्रमाणेच परस्परांशी लढण्यात धन्यता मानत आहे. अशा विखुरलेल्या लोकांवर विजय मिळवण्यासाठी आक्रमक मुसलमानांना बहुसंख्य होण्याची आवश्यकता नाही.

५. मुसलमानांच्या हिंसक धमक्या

‘एम्.आय.एम्.’चे खासदार असदुद्दीन ओवैसी संसदेत शपथ ग्रहणानंतर ‘जय भारत’ म्हणण्याऐवजी ‘जय पॅलेस्टाईन’, अशी देशाचा अपमान करणारी घोषणा देतात, तर त्यांचे बंधू अकबर ओवैसी हे ‘सरकारने १५ मिनिटे पोलीस संरक्षण काढून घ्यावे, म्हणजे आम्ही हिंदूंना पाहून घेऊ’, अशी धमकी देतात. त्यांचे मुल्ला, मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) आणि अन्य नेतेही वारंवार हिंदूंना धमक्या देत असतात. कुणीही त्यांच्या धर्मासंबंधी सत्यकथन केले, तरी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येतात आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीचा शिरच्छेद केला जातो. हिंदु मुलींची अब्रू लुटून त्यांना जीवे मारण्याचे प्रकार तर मुसलमान तरुणांकडून सर्रासपणे केले जात आहेत. गणेशचतुर्थी, रामनवमी, दुर्गापूजा यानिमित्त निघणार्‍या मिरवणुकांवर निश्चितपणे दगडफेक होते. अनेक ठिकाणी मंदिरांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात येते. आतातर नव्याने बांधलेले अयोध्येतील श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याची भाषा काही मुसलमान उघडपणे करत आहेत. नुकतेच उत्तरप्रदेशातील एका मदरशात मोठ्या प्रमाणात बंदुका, पिस्तुले सापडली आहेत. याचा अर्थ मशिदी आणि मदरसे यांचा उपयोग धर्मांध शस्त्रे सांभाळण्यासाठी करू लागला असून तो लढण्यासाठी शस्त्रसज्ज होत आहे.

६. हिंदु धर्माची निंदानालस्ती करतो तो ‘सेक्युलर’ (निधर्मी) !

हिंदूंवर अशा प्रकारे होणारे आक्रमण रोखण्यासाठी तथाकथित ‘सेक्युलर’वादी हिंदू काहीच करत नाहीत. हे मुसलमानांशी जवळीक साधून असणारे हिंदू जर खरे सेक्युलर असते, तर त्यांनी मुसलमानांना हिंसक न होण्याचा सल्ला दिला असता. ते जर खरे सेक्युलर असते, तर त्यांनी मुसलमानांना हिंदूंशी न भांडता प्रेमाने आणि बंधूभावाने वागण्याचा सल्ला दिला असता; परंतु मुसलमानांवर कसलेच आक्रमण न करणार्‍या हिंदूंनाच हिंसक अन् आक्रमक ठरवून दोष देत उपदेश करत असतात. हा कसला धर्मनिरपेक्षतावाद ? स्वर्गीय इंदिरा गांधींनी अवैधपणे ‘सेक्युलर’ हा शब्द राज्यघटनेच्या प्रस्तावनेतच घुसडला. मूळ राज्यघटनेमध्ये तो नव्हता. सध्या या शब्दाचा अर्थ ‘सर्वधर्मसमभाव’ असा राहिला नसून त्याचा अर्थ हिंदु धर्मविरोधी असा झालेला आहे. ‘जो हिंदू, हिंदु धर्म मानत नाही, हिंदु धर्माची निंदानालस्ती करतो तो’, अशी या शब्दाची व्याख्या झालेली आहे. त्यामुळेच कट्टर धर्मांध, अन्य धर्मांचा द्वेष करणारे, हिंदूंना संपवण्याची भाषा करणारे त्यांना ‘सेक्युलर’ वाटतात. या सेक्युलरवाद्यांची मानसिकता कशी असते, याचा अनुभव मला काही दिवसांपूर्वी आला. असदुद्दीन ओवैसी यांनी संसदेत दिलेल्या ‘जय पॅलेस्टाईन’ या घोषणेनंतर मी एक लिखाण समाजमाध्यमांवर प्रसारित केले. याद्वारे ‘देशद्रोही वक्तव्याविषयी सर्वांनी ओवैसींचा निषेध करावा’, अशी सूचना केली. हिंदुविरोधी असलेल्या एका ‘सेक्युलर’ हिंदु आधुनिक वैद्याने मला प्रश्न केला, ‘‘जय भारत’ न म्हणता ‘जय पॅलेस्टाईन’ म्हटले म्हणून काय झाले ? त्यांचे वक्तव्य देशद्रोही कसे म्हणता ? एका संसद सदस्याने ‘जय हिंदु राष्ट्र’ अशी घोषणा दिली आहे. तुम्हाला भारत हिंदु राष्ट्र झाले, तर चालेल का ?’’ ज्यांना ओवैसींच्या वक्तव्यात काहीच गैर वाटत नाही, अशा माणसाला मी हिंदु राष्ट्राविषयी काय सांगणार ? मी त्यांच्याशी वाद घातला नाही.

७. हिंदु राष्ट्र झाले, तरच सर्वधर्मसमभाव टिकून राहील !

‘भारत हे हिंदु राष्ट्र झाले, तर चालेल का ?’, या ‘सेक्युलर’वादी गृहस्थाच्या प्रश्नाला ‘हो’ असेच माझे उत्तर आहे. हिंदु राष्ट्रच झाले पाहिजे; कारण केवळ आपलाच धर्म श्रेष्ठ आहे, अशी शिकवण हिंदु धर्म आपल्या अनुयायांना देत नाही. उलट ‘सर्व धर्मांची शिकवण माणसाला ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवते’, असे हिंदु धर्म मानतो. अहिंसा आणि शांततेच्या मार्गाने जीवन जगून साधनेच्या मार्गाने ईश्वरप्राप्ती साधण्यासाठी तो आपल्या अनुयायांना प्रवृत्त करतो. ‘आमच्या धर्मात आला, तरच तुम्हाला मोक्ष मिळेल’, असे सांगून आमिषे दाखवून अथवा शस्त्र बळावर धर्मांतरे करणार्‍यांपैकी हिंदु धर्म नाही. हिंदु धर्माचे हे श्रेष्ठ तत्त्वज्ञान स्वामी विवेकानंद यांनी जगासमोर मांडले. हिंदु धर्माला जगात प्रतिष्ठा मिळवून दिली. हिंदु धर्माचे हे शांततेचे आणि सर्वधर्मसमभावाचे विचार पटल्याने जगात आदर अन् कुतुहल दिसून येत असून लोक स्वतःहून हिंदु धर्माचा स्वीकार करत आहेत. या गोष्टीला अपवाद आहे तो भारतातील मुसलमानांचा ! शेकडो वर्षे हिंदूंसमवेत राहूनही ते हिंदूंना समजून घेऊ न शकल्याने ते हिंदूंसमवेत शांततापूर्ण जीवन जगू शकत नाही. उलट ते आक्रमणाची भाषा करतात; म्हणून हे हिंदु राष्ट्र झाले, तरच येथे सर्वधर्मसमभाव टिकून राहील आणि सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतील.(क्रमशः)

– श्री. गो.रा. ढवळीकर, ढवळी, फोंडा, गोवा. (सप्टेंबर २०२४)