‘आजच्या घडीला भारतात हिंदु समाज मोठ्या प्रमाणात शिक्षित झालेला आहे आणि २१ व्या शतकात तर ते प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अगदी आदिवासी, दलित इत्यादी मागास गणल्या गेलेल्या लोकांनाही शिक्षणाचे महत्त्व समजल्यामुळे त्या समाजातील लोक चिकाटीने शिक्षण प्राप्त करून प्रगती साधत आहेत. शिक्षणामुळे आर्थिक प्रगतीची दारे खुली होतात आणि सामाजिक दर्जाही उंचावतो. मिळवलेला दर्जा सांभाळायचा, तर प्रत्येक व्यक्तीला आर्थिक आणि कौटुंबिक नियोजन करावे लागते. कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसाठी त्याला धडपड करावी लागते. कुटुंबातील सदस्यांची संख्या मर्यादित राखण्याकरता कुटुंब नियोजनाचा मार्गही पत्करावा लागतो. असे असले, तरी सध्या ‘एकच मूल पुरे’ अथवा ‘मूलच नको’, अशा विचारापर्यंत पती-पत्नी येतात. अशा विचारांचा गंभीर परिणाम हिंदु कुटुंबव्यवस्थेवर होऊ लागलेला आहे. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘घटती लोकसंख्या ही हिंदूंसमोरील मोठी समस्या, धर्माच्या नावाखाली वाढत असलेली इस्लामी लोकसंख्या, वर्ष २०४७ पर्यंत मुसलमान बहुसंख्य होणार ?, जातीजातींत विभागलेला हिंदु समाज आणि हिंदु धर्माची निंदानालस्ती करतो तो ‘सेक्युलर’ (निधर्मी)’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
(भाग ३)
भाग २. येथे वाचा – https://sanatanprabhat.org/marathi/838256.html
८. हिंदू बहूसंख्य आहेत; म्हणूनच लोकशाही टिकून आहे !
हिंदु धर्म, जो सर्व धर्मांचा आदर करण्यास आणि सर्वधर्मसमभावाची शिकवण देतो, त्या धर्माचे अनुयायी जर या देशात अल्पसंख्यांक अन् मुसलमान बहुसंख्य झाले, तर या देशाचे काय होईल ? याची कल्पना करणेही भयंकर आहे. अल्पसंख्य असूनही मुसलमान राज्यकर्त्यांनी हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले आहेत. तेच जर या देशात बहुसंख्य झाले, तर हिंदूंचे काय होणार ? आज पाकिस्तान अथवा बांगलादेश येथे काय चालले आहे, हे हिंदूंनी डोळे उघडे ठेवून पहावे, म्हणजे त्यांना याची थोडीतरी कल्पना येईल. राज्यघटना रक्षणाची, लोकशाहीची चिंता जे सध्या करत आहेत, त्या धर्मनिरपेक्षतावाद्यांनी सर्व प्रथम या गोष्टीचा विचार करावा. लोकशाही, बंधूभाव हे विषय हिंदूंच्या रक्तातच आहेत. पाश्चात्त्य देशात या शब्दांची ओळख त्या लोकांना होण्याआधी भारतीय लोक ही तत्त्वे पाळत आलेले आहेत. त्यामुळे धर्मनिरपेक्षतावाद्यांनी हे लक्षात घ्यावे की, या देशात हिंदू बहुसंख्य आहेत; म्हणूनच लोकशाही आहे. हिंदू जर अल्पसंख्य झाले, तर लोकशाही, सर्वधर्मसमभाव या संकल्पना संपुष्टात येतील. राज्यघटना आणि भारतीय न्यायव्यवस्था यांचे काय होईल ? याचा विचार सेक्युलरवाद्यांनी करावा. सत्ता जर मुसलमानांच्या हाती गेली, तर जे हिंदू सेक्युलर म्हणून मुसलमानांची पाठराखण करतात, ते हिंदू असल्याने त्यांच्या हातात सत्ता जाऊ नये; म्हणून सर्वप्रथम त्यांना कारागृहात टाकले जाईल. छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्याचा मार्ग दाखवला; म्हणून औरंगजेबाने गणोजी शिर्केचा सत्कार केला नाही, तर त्याचे शिरकाण केले, हेही सेक्युलरवादी हिंदूंनी लक्षात घ्यावे. इतर हिंदूंप्रमाणेच त्यांचेही हालहाल केले जातील, हे त्यांनी लक्षात घ्यावे.
९. मुसलमानबहुल भागात चालते शरीयतचे राज्य !
हिंदूंनी लक्षात घ्यावे की, मुसलमान लोक शरीयतखेरीज दुसरे काही मानायला सिद्ध नाहीत. ते राज्यघटना अथवा भारतीय न्यायव्यवस्थेचा आदर करत नाहीत. अलीकडेच एक बातमी वाचनात आली की, बंगालच्या ज्या भागात मुसलमानांची संख्या ३० टक्क्यांहून अधिक आहे, तेथील पुढार्यांनी त्या भागात शरीयत कायदा लागू केला आहे. त्या आधारे ते हिंदूंवर अत्याचार करत आहेत. बंगाल, उत्तरप्रदेश, बिहार, आसाम या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत मुसलमानांचे प्रमाण ४० टक्के, तर काही जिल्ह्यांत ते ५० टक्क्यांच्या वर गेलेले आहे. अशा भागांत हिंदूंना वास्तव्य करणे अशक्य झालेले असून त्यांना स्थलांतर करणे भाग पडत आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी अलीकडे सांगितले, ‘आसाममध्ये मुसलमानांची संख्या ४० टक्क्यांच्या वर गेली असून तिथे जीवनमरणाचा प्रश्न उद्भवलेला आहे.’
१०. हिंदूंना सुरक्षित ठेवणार्या हिंदुत्वनिष्ठ पक्षांना निवडून देणे महत्त्वाचे !
हिंदूंना या देशात टिकून रहायचे असेल, तर आपण बहुसंख्य रहाणे आणि संख्येच्या आधारावर निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला संरक्षण देईल, अशा हिंदुत्वनिष्ठ पक्षाला निवडून लोकशाही मार्गाने स्वतःचे सरकार आणणे एवढेच आपल्या हातात आहे. यापुढे होणार्या विधानसभा, तसेच लोकसभा निवडणुकीत हिंदूंनी जागरूकतेने मतदान केले, तरच या देशात हिंदू सुरक्षित रहातील. अन्यथा आणखी सहस्र वर्षे हा देश गुलामगिरीत जाईल आणि धर्मनिरपेक्षतावादी हिंदूंसह सर्वच हिंदू अत्याचारांच्या वरवंट्याखाली भरडले जातील, याची जाणीव विशेषतः तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी हिंदूंनी ठेवावी.’
(समाप्त)
– श्री. गो.रा. ढवळीकर, ‘सुरश्री’, ढवळी, फोंडा, गोवा.(सप्टेंबर २०२४)