१. मूत्रपिंडाचा त्रास अनुवांशिक असणे
‘वर्ष १९८६ पासून मला मूत्रपिंडाचा (किडनीचा) थोड्याफार प्रमाणात त्रास होत आहे. हा त्रास अनुवांशिक असल्याने आमच्या कुटुंबातील प्रत्येकालाच हा त्रास आहे. मुतखडे होणे, ते पडणे आणि परत होणे ही प्रक्रिया अनेक वर्षे सातत्याने चालू आहे.
२. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असतांनाही मूत्रपिंडाचा त्रास होणे, त्यावर औषधोपचार करणे; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मूत्रपिंडाची कार्यक्षमता १०० टक्के टिकून रहाणे
मी मागील २६ वर्षे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे. या कालावधीत अनेक वेळा मला मूत्रपिंड दुखणे, मुतखडे होणे आणि ते पडणे अन् त्यासाठी पुष्कळ औषधे घ्यावी लागणे, असे त्रास झाले. माझ्या मूत्रपिंडाचे २ वेळा शस्त्रकर्म करावे लागले. त्याच्यावर अजूनही औषधोपचार घ्यावे लागतात; पण एवढ्या कालावधीमध्ये मूत्रपिंडे जशीच्या तशी कार्यरत आहेत. त्यांची क्षमता १०० टक्के आहे, हे मागील २ मासांपूर्वी केलेल्या चाचणीत लक्षात आले. ही परम पूज्य डॉक्टरांनी माझ्यावर केलेली मोठी कृपाच आहे. त्यामुळेच मी साधनेत टिकून आहे. ‘परम पूज्य डॉक्टरच न सांगता साधकाची काळजी घेतात आणि साधनेअंतर्गत त्रास होणारे घटक शरीर, मन अन् बुद्धी यांना चांगले ठेवतात’, हे यातून शिकायला मिळाले.
३. गुरुकृपेने अशक्य ते शक्य होणे
माझे दोन्ही भाऊ साधनेत नव्हते. त्यांनाही मूत्रपिंड आणि हृदयविकार हे त्रास होते. माझा मोठा भाऊ वयाच्या ६२ व्या वर्षी आणि लहान भाऊ ५८ व्या वर्षी वारला. गुरुकृपा असेल, तर कुठलीही गोष्ट सोपी होते. अध्यात्माच्या भाषेत बोलायचे झाले, तर पांगळा माणूस डोंगर चढू शकतो, बहिरा ऐकू शकतो, आंधळा बघू शकतो आणि मुका बोलू शकतो. मला असणारा मृत्यूयोग प.पू. डॉक्टरांनी टाळला आणि मला साधनेत टिकवून ठेवले आहे.
‘प.पू. डॉक्टर, आपल्या कृपाशीर्वादाने मला पुनर्जन्म मिळाला. आपणच आमच्याकडून साधना करून घेत आहात. हे गुरुऋण कधीच फेडता येणार नाही. आपल्याला अपेक्षित आहे, अशी प्रगती करून घ्यावी आणि सतत आपल्या चरणी ठेवावे, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. मधुसूदन कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६१ वर्षे), फोंडा, गोवा. (१०.४.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |