एक सत्संग घेत असतांना ‘बोलविता धनी भगवंत आहे’, याची अनुभूती घेणार्‍या सौ. स्वाती संदीप शिंदे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

‘एकदा मी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्या मुखातून बोलणार आहेत. मला काहीच येत नाही. तेच मला सर्वकाही सुचवणार आहेत’, असा भाव ठेवून सत्संगाला आरंभ केला. देवच मला गुरुदेवांच्या भेटीतील आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या सहवासातील क्षण अन् विषयाला अनुसरून विविध उदाहरणे सुचवत होता. ती सूत्रे मांडतांना मला आतून पुष्कळ स्थिरता आणि आनंद जाणवत होता. ‘सत्संगातील साधकांना अधिकाधिक साहाय्य कसे करू शकतो ?’, असा विचार माझ्या मनात येऊन त्याप्रमाणे माझे बोलणे होत होते.

सौ. स्‍वाती शिंदे

सत्संगाचा समारोप करतांना मी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डोळे मिटले. तेव्हा मला अनुभवता आले, ‘समोरच्या साधकांना मी काहीतरी सांगावे’, अशी माझी पात्रता नाही आणि तो माझा अधिकारही नाही. केवळ आम्ही सर्व गुरुसेवक असल्याने समोरचे साधक मी जे सांगत आहे, ते मनापासून ऐकत असतील, तर निश्चितपणे त्या साधकांच्या माध्यमातून श्री गुरूंची शक्ती आणि त्यांचाच अधिकार कार्यरत झाला आहे.’ गुरुदेवांच्या कृपेनेच मला ‘मी केवळ माध्यम असून ‘बोलविता धनी भगवंत आहे’, हे अनुभवता आले. त्यामुळे मला कृतज्ञता वाटून माझी भावजागृती झाली आणि ती भावावस्था मला पुष्कळ वेळ अनुभवता आली.’

– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.२.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक