कोल्हापूर – लिंगायत समाज हा हिंदूच आहे. त्यामुळे हिंदु म्हणूनच जन्माला आलो आणि हिंदु म्हणूनच मरणार, असे ठाम मत नवनिर्वाचित भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केले. डॉ. अजित गोपछडे यांनी चालू केलेल्या ‘भक्तीपीठ ते शक्तीपीठ वीरशैव लिंगायत सन्मान यात्रे’चे कोल्हापुरात स्वागत करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम ‘हिंदु वीरशैव लिंगायत मंच, कोल्हापूर’ यांच्या वतीने कोल्हापूर मधील श्री सिद्धगिरी मठ, कणेरी येथे अत्यंत उत्साहात कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमामध्ये डॉ. अजित गोपछडे यांनी वीरशैव समाजातील सर्व पोट जातींचे निवेदन स्वीकारले, तसेच येथील लहान-मोठ्या सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी हिंदु वीरशैव लिंगायत मंचाकडून श्री. सुनील चंद्रकांत वांकर, वैद्या अश्विनी माळकर, श्री. अविनाश चरणकर, श्री. सुनील आडवी, श्री. जीवन टाकळे, सौ. वंदना बंबलवाड आणि सहकारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.