अलवर (राजस्थान) – देशात काही चांगले घडले, तर हिंदु समाजाची कीर्ती वाढते. काही चूक झाली, तर त्याचे दायित्वही हिंदु समाजावर येते; कारण ते या देशाचे कर्तेधर्ते आहेत, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले. ते येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये स्वयंसेवकांना संबोधित करतांना बोलत होते.
सरसंघचालकांनी मांडलेली सूत्रे
१. ज्याला आपण हिंदु धर्म म्हणतो तो खरा मानवधर्म आहे. हा जागतिक धर्म आहे आणि तो सर्वांच्या कल्याणाची इच्छा करतो. हिंदु म्हणजे जगातील सर्वांत उदार मनुष्य. हिंदु म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वीकारणारा. ज्याची सर्वांशी सद़्भावना आहे. जो ज्ञानाचा वापर वाद निर्माण करण्यासाठी नाही, तर ज्ञान देण्यासाठी करतो, तो हिंदु होय.
२. देशात कौटुंबिक मूल्ये धोक्यात आहेत. माध्यमांच्या गैरवापरामुळे नवी पिढी आपली मूल्ये झपाट्याने विसरत चालली आहे. हा चिंतेचा विषय आहे.