भारत देशावर मोगल आणि इंग्रज यांनी अनेक वर्षे राज्य केले. लाखो हिंदूंची हत्या करून मंदिरांची लूट केली. मोगलांनी भारतातील महत्त्वाची सर्व मंदिरे पाडून तेथे मशिदी आणि मदरसे निर्माण केले. मुसलमानांनी अनेक देवस्थानांच्या भूमी बळकावून त्यावर त्यांचा अधिकार सांगितला. देशाची फाळणी करून पाकिस्तान आणि बांगलादेश यांची निर्मिती झाली. आता पाकिस्तानात आणि बांगलादेशात प्रतिदिन हिंदूंवर आक्रमणे होऊन त्यांना देशातून हाकलून लावले जात आहे. त्यांची संपत्ती आणि हिंदु महिलांची अब्रू लुटली जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनही मुसलमानांकडून हिंदूंवरील अत्याचार संपलेले नाहीत. या व्यतिरिक्त पुरोगामी आणि साम्यवादी यांच्याकडून देशाला धोका आहे. शहरी नक्षलवाद वाढू लागला आहे. प्रतिदिन लव्ह जिहाद, लँड जिहाद, हलाल पद्धत, धर्मांतर, दंगली, वक्फ कायद्याद्वारे देशातील सर्व भूमी कह्यात घेण्याचे धर्मांधांचे षड्यंत्र, हिंदूंच्या सणांच्या वेळी धर्मांधांकडून हिंदूंच्या मिरवणुकीवर होणारी दगडफेक, हिंदूंच्या मालमत्तेची हानी करणे, अशा अनेक घटना सर्रासपणे घडत आहेत. यांतील बर्यापैकी सर्व घटनांची हिंदूंना माहिती असतांनाही काही हिंदू वगळता देशातील असंख्य हिंदूंना आपण देश अन् राष्ट्र यांसाठी काहीतरी करायला हवे, संघटित व्हायला हवे, धर्मांध मुसलमानांच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी काहीतरी हालचाली करायला हव्यात, असे अजिबात वाटत नाही. ही सर्वांत मोठी शोकांतिका आहे. वरील गोष्टी घडत असतांना कृतीशील होण्यामध्ये हिंदूंची कोणती उदासीनता आहे, हे लक्षात येत नाही.
हिंदु अजूनही सुस्त अजगराप्रमाणे झोपला आहे. जगातील इतर देशात रहाणार्या लोकांना त्यांचा देश, संस्कृती, धर्म यांविषयी जिव्हाळा आणि प्रेम असते. त्यामुळे त्या देशातील लोकांची त्यांच्या देशासाठी काहीही करण्याची सिद्धता असते, हे इस्रायल, रशिया, जपान या देशांतील लोकांच्या वर्तनावरून पहायला मिळते. इस्रायलमध्ये तर प्रत्येक घरातील स्त्री-पुरुषांनी सैन्यदलात १ वर्ष राहून शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे; मात्र भारतात वरील सर्व गोष्टी घडत असतांना हिंदू मतभेद, जात-पात, आरक्षण आणि स्वतःचा स्वार्थ यांमध्ये गुरफटला आहे. त्याला इतर गोष्टी करण्यासाठी वेळच नाही.
वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाविषयी हिंदूंची उदासीनता !
वक्फ कायदा मुसलमान समुदायाच्या संपत्ती आणि धार्मिक संस्था यांचे व्यवस्थापन, तसेच नियमन यांसाठीचा एक कायदा आहे. त्यासाठी प्रत्येक राज्यात वक्फ बोर्ड स्थापन करण्यात आले आहे. या कायद्याच्या ओघातच वक्फ बोर्डाला कुठलीही संपत्ती त्याच्या मालकीची असल्याचे घोषित करण्याचा अधिकार मिळालेला आहे. बिहारमधील फतूहाजवळ असलेल्या गोविंदपूर गावातील ९५ टक्के हिंदूंना गाव रिकामा करण्याचा आदेश वक्फ बोर्डाने दिलेला आहे. गोविंदपूरमध्ये ९५ टक्के लोक हिंदु आहेत. ते शेकडो वर्षांपासून तेथे रहात आहेत; परंतु वक्फचे म्हणणे आहे की, गावाच्या पाठीमागे एक मजार आहे आणि हे संपूर्ण गावच त्यांचे कब्रस्तान आहे. वक्फ बोर्डवाले आता मंदिरांच्या संपत्तीवर अधिकार गाजवू लागले आहेत. अशा घटना देशात सर्वत्र घडत असल्याने या कायद्याला हिंदूंचा विरोध आहे. त्यानुसार संसदेत हा विषय आला आहे. वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक २०२४ साठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यात आली असून त्यांनी जनतेकडून याविषयी अभिप्राय मागितले होते. किती हिंदूंनी या संदर्भात संयुक्त संसदीय समितीला ईमेल पाठवून वक्फ बोर्डाला विरोध केला ? मुसलमान प्रत्येक घरी जाऊन वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाविरुद्ध हरकती पाठवत आहेत. देशातील विविध हिंदु संघटनांकडून एक स्कॅन मोहीम चालू करण्यात आली आहे; मात्र गुजरात वगळता देशातील इतर राज्यांत याविषयी हिंदूंमध्ये उदासीनता दिसून आली. महाराष्ट्रात बहुंताश गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना हा विषयच ठाऊक नाही. एकीकडे डॉल्बी सिस्टम लावून नृत्य करणे, लेझर देखावा सादर करणे याला वेळ द्यायला हिंदूंना वेळ आहे; मात्र वक्फ कायद्याविषयी ते माहिती जाणून घेत नाहीत, ही शोकांतिका आहे. वक्फ बोर्डाच्या या घातक कायद्याविषयी अनभिज्ञ असण्यामधून हिंदूंची उदासीनता दिसून येते.
देशात हिंदूविरोधी घटना घडतांनाही हिंदूंची उदासीनता !
जळगाव येथे मोहित चव्हाण या हिंदु तरुणाने आयेशा नावाच्या मुसलमान तरुणीला इव्हेंटच्या कामासाठी नाशिक येथून जळगाव येथे बोलावून घेतले होते; पण यांच्यात प्रेमसंबध आहे, असा खोटा समज करून ३०० ते ४०० मुसलमान त्याला मारण्यासाठी संघटित झाले होते. यातील १०-१२ धर्मांधांनी मोहित याला अमानुषपणे मारहाण केली. येथे महत्त्वाचे म्हणजे मोहित हा केवळ मुसलमान तरुणीशी बोलला; म्हणून त्याच्यावर संशय घेणारे मुसलमान किती सतर्कपणे वागतात, हे यातून दिसून येते. दुसरीकडे घरातून किंवा बाहेर लव्ह जिहाद आणि हिंदु महिलांची छेडछाड प्रतिदिन सर्रास घडत असतांनाही हिंदू त्याकडे गांभीर्याने पहात नाहीत किंवा अनेक हिंदू अशा घटनांच्या विरोधात संघटित होत नाहीत. दुसरीकडे यंदाच्या गणेशोत्सवाच्या वेळी हिंदूंना लव्ह जिहाद, लँड जिहाद, वक्फ बोर्डाचा कायदा यांविषयी माहिती देण्यासाठी काही हिंदुत्वनिष्ठ गेले असतांना त्याविषयी ऐकून घेण्याचीही अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांची सिद्धता नव्हती. हिंदूंची ही उदासीनता पाहून मान लज्जेने खाली घालावीशी वाटते.
पाकिस्तान आणि बांगलादेश येथे हिंदूंची संपत्ती लुटली जात आहे. बांगलादेशातील अनेक हिंदूंकडून सरकारी नोकर्या काढून घेण्यात आल्या आहेत. बांगलादेशात प्रतिदिन हिंदूंवर आक्रमणे चालू असून हिंदूंना देश सोडून पळून जाण्यास भाग पाडले जात आहे. देशातील धर्मांधांकडून हिंदूंचे सण आणि इतर उत्सव या वेळी हिंदूंवर आक्रमणे करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न होत आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद, हलाल यांद्वारे हिंदूंचे खच्चीकरण करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न होत आहे. असे असतांना देशातील बहुतांश हिंदू एकतर या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात किंवा याविषयी केवळ चर्चा करून हा विषय सोडून देतात. असेच होत राहिल्यास भारतातील हिंदूंची बांगलादेशातील हिंदूंसारखी स्थिती होईल. असे न होण्यासाठी हिंदूंनी संघटित आणि कृतीशील होणे आवश्यक आहे.
हिंदूंनो, जात-पात विसरून संघटितपणे लढा द्या !
हिंदूंनी रात्र नव्हे, दिवस नव्हे, तर प्रत्येक क्षण वैैर्याचा आहे, हे लक्षात घेऊन संघटित होणे आवश्यक आहे. विविध पक्षांतील राजकीय लोकांच्या आमिषाला न फसता हिंदूंनी देशाचे हित पाहून धर्म आणि हिंदूंचे रक्षण करणार्या नेत्यांनाच निवडून दिले पाहिजे. हिंदूंनी जात-पात विसरून धर्माच्या रक्षणासाठी संघटित झाले पाहिजे. हिंदूंकडे शक्ती, बुद्धी, कौशल्य असे सर्व गुण असतांना त्यांनी जात-पात विसरून या गुणांचा वापर हिंदु धर्माचे रक्षण आणि हिंदुहित यांसाठी करणे आवश्यक आहे. असे केल्यानंतर देशात हिंदु राष्ट्र स्थापन होण्यास वेळ लागणार नाही.
हिंदूंनी त्यांच्यावरील आक्रमणांच्या विरोधात आवाज न उठवणे आणि संघटित न होणे, ही त्यांची उदासीनता असून ती आत्मघातकी आहे ! |