|
जळगाव, १५ सप्टेंबर (वार्ता.) – शहरातील एका उपाहारगृहात आयोजित कार्यक्रमाच्या संयोजनासाठी (इव्हेंट मॅनेजमेंटसाठी) ‘केटरर’चेे (स्वयंपाकाचे कंत्राट) काम निश्चित करण्यासाठी नाशिक येथून आयेशा अली खान (वय २२ वर्षे) ही तरुणी आली होती. कार्यक्रमाचे संयोजन करणारा हिंदु तरुण श्री. मोहित राजेश चव्हाण (वय २७ वर्षे) हा तिला घेऊन फिरत असल्याच्या कारणावरून धर्मांधांनी चव्हाण यांना धारदार शस्त्रांद्वारे आक्रमण केले. ही घटना १४ सप्टेंबर या दिवशी घडली. चव्हाण हे गंभीर घायाळ झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच शहरातील हिंदुत्वनिष्ठ संघटित झाले. या ठिकाणी किरकोळ दगडफेकही झाली. पोलिसांनी ५ धर्मांधांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांपैकी ४ जणांना अटक केली आहे. धर्मांध आरोपी फारूख आसिफ खाटीक, अकरम खाटीक, भुर्या, सहेबाब उपाख्य पाद्या अशी आरोपींची नावे आहेत.
१. मोहित चव्हाण यांना एका समारंभातील स्वयंपाकाच्या संयोजनासाठी व्यक्तीची आवश्यकता असल्याने त्यांनी आयेशा खान हिला संपर्क करून स्वयंपाकाच्या नियोजनासाठी व्यक्ती पुरवण्यास सांगितले होते. त्याची नोंदणी (बुकींग) करण्यासाठी आयेशा जळगाव येथे आली होती. त्यांनी आयेशा हिच्या पालकांची अनुमती घेऊनच तिला नाशिक येथे बोलावले होते. चव्हाण हे तिला आणण्यासाठी रेल्वेस्थानकावर गेले. तेथून ते दोघे जण दुचाकीवरून एम्.आय.डी.सीतील एका उपाहारगृहात नोंदणीसाठी जात होते. त्या वेळी तिने हिजाब घातला होता.
२. चव्हाण यांच्या दुचाकीचा २ धर्मांध दुचाकीस्वारांनी पाठलाग केला. आयेश हिला काही तरी सांगून तिला दुसरीकडे घेऊन गेले आणि चव्हाण यांना शेरा चौक येथे घेऊन गेले. तिथे ३०० ते ४०० मुसलमानांच्या जमाव होता. त्यांतील १० ते १२ धर्मांधांनी ‘तरुणीशी तुझा काय संंबंध ? तिला घेऊन कुठे फिरतोस ? तुही त्याच्यासमवेत का फिरतेस ?’ असे प्रश्न विचारून लोखंडी दांड्यासह चॉपरसारखी धारदार शस्त्र आणि प्लास्टिकच्या आसंदी अंगावर टाकून चव्हाण यांच्यावर आक्रमण केले.
३. ही गोष्ट तेथून जाणार्या ५ ते ६ हिंदुत्वनिष्ठांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी चव्हाण यांना वाचवण्यासाठी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना धर्मांधांच्या तावडीतून सोडवले.
४. चव्हाण यांनी ‘आमचे प्रेमसंबंध नसून आम्ही कामानिमित्त येथे आलो आहोत’, हे सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु धर्मांध ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.
५. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठही मोठ्या संख्येने एकत्र आलेे. नंतर पोलीस अधीक्षक घटनास्थळी आले.
धर्मांधांनी मुलीच्या पालकांना ‘तुमची मुलगी मोहितसमवेत उपाहारगृहात सापडली. ते चुकीचे काम करत होते’, अशी धांदात खोटी माहिती दिली; मात्र आयेशा हिने ‘धर्मांधांनीच गलिच्छ शिवीगाळ करून मारहाण केली आहे’, असे पालकांना सांगितले. यातून चव्हाण यांना अडकवण्याचा कट उघड झाला. |
धर्मांधांनी आयेशाला दुसरीकडे नेले होते. चव्हाण यांना पुष्कळ मारहाण केल्यानंतरही ते म्हणाले, ‘‘आयेशा हिच्या पालकांनी माझ्या विश्वासावर तिला येथे पाठवले आहे. जोपर्यंत ती येत नाही, तोपर्यंत मी रुग्णालयात जाणार नाही.’’ तेव्हा पोलिसांनी धर्मांधांच्या तावडीतून आयेशा हिची सुटका करून तिला बंदोबस्तात पोलीस ठाण्यात नेले. |
संपादकीय भूमिकाकुठे हिंदु तरुण आणि मुसलमान तरुणी व्यावसायिक कामानिमित्तही एकत्र आल्याचे पाहून हिंदूंच्या जिवावर उठणारे धर्मांध मुसलमान, तर कुठे हिंदु तरुणींशी लव्ह जिहाद करणार्या मुसलमान तरुणांविरुद्ध साधी तक्रारही न करणारे हिंदू ! |