‘फेब्रुवारी २०२४ मध्ये एकदा मी किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांना भ्रमणभाषद्वारे संपर्क केला होता. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर या मासांमध्ये काळ कठीण आहे. या दिवसांत तिसरे जागतिक महायुद्ध भडकण्याची शक्यता आहे. ‘भारताला त्याचा त्रास होऊ नये’, यासाठी मी अधिकाधिक ध्यान करत आहे.’’
याविषयी काही मासांनी पुढील घटना घडली, ‘३१.७.२०२४ या दिवशी इस्रायलने इराणमध्ये उपस्थित असलेला ‘हमास’ या आतंकवादी संघटनेचा प्रमुख कमांडर हानिया याला ठार मारले. त्यामुळे इराण आणि इस्रायल यांच्यात पुष्कळ तणाव निर्माण झाला अन् ऑगस्टमध्ये इराणच्या समर्थनार्थ काही देश आणि इस्रायलच्या समर्थनार्थ काही देश युद्धाविषयी बोलू लागले. यांतून तिसरे महायुद्ध पेटण्याची शक्यता निर्माण झाली होती. तेव्हा मला प.पू. देवबाबांचे वरील बोलणे आठवले आणि ‘संत भारताच्या रक्षणासाठी निरपेक्षतेने, निःस्वार्थपणे आणि प्रसिद्धीपासून दूर राहून कार्य करत असतात. त्यामुळे अशा संतांप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही अल्पच आहे’, हे माझ्या लक्षात आले.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.८.२०२४)