साधकांसाठी सूचना
‘नियतकालिक सनातन प्रभात म्हणजे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत असलेले एकमेव वृत्तपत्र ! या नियतकालिकाद्वारे जिज्ञासू वाचकांची अध्यात्माविषयीची ज्ञानतृष्णा भागवली जाते, तसेच राष्ट्र अन् धर्म प्रेमी वाचकांना धर्मकार्य करण्याची प्रेरणा मिळते. अंतरंगात अंकुरलेल्या साधनारूपी बिजाचे वटवृक्षात रूपांतर करणारे, तसेच अंतरातील हिंदुत्वाची मशाल पेटती ठेवणारे हे नियतकालिक सर्व वाचकांना नियमितपणे मिळणे आवश्यक आहे. असे असतांनाही काही जिल्हे आणि राज्ये यांमधील साधकांकडून या नियतकालिकांचे नूतनीकरण वेळेत होत नाही. त्यामुळे वाचकांना त्यातील अमूल्य ज्ञानापासून वंचित रहावे लागते. सर्व नियतकालिकांचे आवृत्तीनुसार शेष नूतनीकरण खाली दिले आहे.
१. सर्व नियतकालिकांचे शेष नूतनीकरण
चंद्रपूर जिल्ह्याचे जुलै मासापर्यंतचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. गोवा राज्य, तसेच रायगड, छ. संभाजीनगर, नांदेड, अकोला, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांचे जुलै मासापर्यंतचे नूतनीकरण अत्यल्प संख्येत राहिले आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि जळगाव या जिल्ह्यांचे ऑक्टोबर मासापर्यंतचे नूतनीकरण अधिक संख्येत शेष असल्याने त्यांनी त्यासाठी तळमळीने प्रयत्न करावेत.
२. साधकांनी ३१.९.२०२४ या दिवसापर्यंत सर्व शेष नूतनीकरण प्राधान्याने पूर्ण करावे !
सर्वच जिल्ह्यांतील साधकांनी ‘नूतनीकरण मोहिमे’ला प्रथम प्राधान्य देऊन शेष नूतनीकरण वर दिलेल्या कालावधीतच पूर्ण करावे. प्रत्यक्ष नूतनीकरण करतांना ते काही मास अगोदरचे न करता वाचकाच्या अंकाची वर्गणी जेव्हा संपते, त्यानंतरच्या पुढील अंकापासूनच होईल, याची दक्षता घ्यावी. नूतनीकरणाची सेवा परिपूर्ण करून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची कृपा संपादन करता यावी, यासाठी नूतनीकरणाच्या अंतर्गत येणार्या सर्व सेवा त्रुटींविरहित आणि भावपूर्ण कराव्यात.
भारतभरातील २,९१२ वाचकांचे जुलै मासापर्यंतचे, तर ७,२७० वाचकांचे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर मासांतील नूतनीकरण होणे शेष आहे. यावरून एकूण १०,१८२ वाचकांचे ऑक्टोबर पर्यंतचे नूतनीकरण शेष असल्याचे लक्षात येईल. (८.९.२०२४)