गुरुबोध

gurupournima१. भगवंताची प्रचीती आपल्याजवळ असणे, म्हणजे सुखरूप.

२. ग्रंथींचा भेद करणारा तो ग्रंथ.

३. उपवास म्हणजे परमेश्वराच्या निकट वास्तव्य करणे होय.

४. मनुष्याचे श्रेष्ठत्व त्याच्या दिव्यत्वाच्या प्रचीतीवर अवलंबून आहे.

५. ईश्वराच्या प्रेमाचा डोह आत सिद्ध झाला की, योग, याग, नाना प्रकारच्या यातना या सर्वच गोष्टी तुच्छ वाटतात. ईश्वराचे आकलन झाल्यावर बाकी सर्व गोष्टीतील फोलपणा जाणवतो.

– प्रा. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, कोल्हापूर (‘गुरुबोध’)