मंदिरांचा निर्वाह चालवण्यासाठी राजे-महाराजे आणि श्रीमंत लोकांनी मंदिरांना भूमी अर्पण केली होती. त्या भूमीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे. मंदिरांच्या भूमी भाडेतत्त्वावर देण्यात आल्या होत्या. इंदिरा गांधी यांनी ‘सिलिंग’चा कायदा लावला, तेव्हा ‘मंदिराच्या भूमींचे भाडे द्यायचे नाही’, असा अपप्रचार करण्यात आला. तेव्हापासून त्या भूमींचे भाडे देणे बंद झाले.
मंदिरांच्या भूमीवरील अतिक्रमण हटवण्यासंदर्भातील अनेक खटले न्यायालयात चालू आहेत. या मंदिरांना त्यांची भूमी मिळवून देण्यासाठी ‘देवस्थान समिती विदर्भ’ स्थापन करण्यात आली. या समितीच्या अंतर्गत आजपर्यंत १ सहस्र ५०० एकर भूमी मंदिरांना परत करण्यात यश मिळाले. काही स्वार्थी लोकांमुळे मंदिरांच्या भूमीवर सतत अतिक्रमण होत आहे. त्यामुळे मंदिर विश्वस्तांनी सतर्क रहाणे आवश्यक आहे, तसेच मोठ्या मंदिरांनी लहान मंदिरांना साहाय्य केले, तर आपण सहजपणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेकडे अग्रेसर होऊ शकतो. यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना करण्यात आली आहे.