‘ड्रोन’द्वारे महाराष्ट्राच्या मंत्रालयावर लक्ष, सुरक्षेचा ४१ कोटी रुपयांचा आराखडा !

मुंबई, २३ ऑगस्ट (वार्ता.) – महाराष्ट्राच्या मंत्रालयावर ‘ड्रोन’द्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. मंत्रालयाच्या सुरक्षेच्या दुसर्‍या टप्प्याचा ४१ कोटी ७५ लाख ५ सहस्र ६३४ रुपयांचा आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. या अंतर्गत ‘ड्रोन’ साठी ४० लाख ५७ सहस्र ७२५ रुपयांचा निधी देण्यात आला आहे. याविषयी २३ ऑगस्ट या दिवशी शासन आदेश काढण्यात आला आहे.

सुरक्षेच्या दुसर्‍या टप्प्यामध्ये मंत्री गेट, आरसा गेट, गार्डन गेट आणि एनएबी गेट या चारही प्रवेशद्वारांवर मंत्रालयात प्रवेश करणार्‍यांची संपूर्ण पडताळणी करणारी यंत्रणा बसवण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त मंत्रालयात येणार्‍यांना प्रवेशपत्र देण्याची यंत्रणा, त्यांची पडताळणी, वाहनव्यवस्था, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावणे आणि त्याचा रेकॉर्ड ठेवण्याची व्यवस्था आदी विविध व्यवस्था करण्यात येणार आहेत.