PM Modi met Zelensky in Ukraine : पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनमध्ये घेतली झेलेंस्की यांची भेट

युक्रेनला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान !

पंतप्रधान मोदी आणि व्लोदिमिर झेलेंस्की

कीव (युक्रेन) – पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनची राजधानी कीव येथे जाऊन राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांची भेट घेतली. दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी झेलेंस्की यांच्या खाद्यांवर हात ठेवले. यानंतर दोन्ही नेते युक्रेनच्या राष्ट्रीय संग्रहालयात गेले. तेथे त्यांनी रशिया-युक्रेन युद्धात मारल्या गेलेल्या मुलांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान मोदी ७ घंटे युक्रेनमध्ये थांबणार आहेत. यात दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक होणार आहे. युक्रेनला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. २४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून ‘नाटो’ देशांव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशाच्या नेत्याने युक्रेनला भेट दिलेली नाही. ‘नाटो’ ही ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ नावाची जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक सैनिकी संघटना आहे.

पंतप्रधान मोदी पोलंडची राजधानी वॉर्सा येथून १० घंटे रेल्वे प्रवास करून कीव येथे पोचले. येथे त्यांचे भारतीय वंशांच्या लोकांनी स्वागत केले. मोदी यांनी येथील फोमिन बोटॅनिकल गार्डनमधील मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केले.