उधमपूर (काश्मीर) – येथे (Kashmir) सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत २ आतंकवादी ठार झाले. सैन्याला ११ सप्टेंबरला सकाळी उधमपूरमधील खांद्रा टॉपच्या जंगलात २-३ आतंकवादी(Terrorists) लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांसह शोधमोहीम राबवण्यात आली. दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी आतंकवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात सैनिकांनीही गोळीबार केला. अनुमाने ४ घंटे चाललेल्या या चकमकीत सुरक्षादलांनी आतंकवाद्यांना ठार मारले.
पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
११ सप्टेंबरला रात्री अडीच वाजता पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू-काश्मीरमधील अखनूरमधील सीमेवर गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा १ सैनिक घायाळ झाला. या आक्रमणाच्या प्रत्युत्तरात सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनीही गोळीबार केला. या कारवाईत पाकिस्तानची किती हानी झाली ?, हे अद्याप समजलेले नाही. या घटनेनंतर सीमेवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकापाकिस्तानाला जगाच्या नकाशावरून पुसून टाकणे, हाच काश्मीर आतंकवादमुक्त करण्याचा एकमेव मार्ग आहे, हे सरकारने लक्षात घेऊन त्यानुसार कृती करावी ! |