पुणे – येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा बंदीवान राजू दुसाने पसार झाला आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दुसाने याच्या विरोधात वर्ष २०१५ मध्ये हत्येचा गुन्हा नोंद झाल्याने त्याला फेब्रुवारी २०२१ मध्ये जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली होती. १९ ऑगस्ट या दिवशी बंदीवानांच्या हजेरीच्या वेळी तो नव्हता. (बंदीवान पसार होतो, यातून कारागृह प्रशासनाचे अधिकारी झोपलेले असतात का ? – संपादक)