धर्मांधाच्या त्रासाला कंटाळून हिंदु तरुणीची आत्महत्या !

  • छत्रपती संभाजीनगर येथे ‘लव्ह जिहाद’ !

  • ८ महिन्यांपासून धर्मांध तरुणीच्या मागे लागला होता !

छत्रपती संभाजीनगर – गावातील गॅरेजवर काम करणार्‍या धर्मांध मेकॅनिक कासीम यासिन पठाण (वय २१ वर्षे) याच्या जाचाला कंटाळून १६ वर्षांच्या मुलीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार १८ ऑगस्ट दिवशी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शहराजवळ असलेल्या जटवाड्याजवळील ओहर गावामध्ये घडला. कु. पूजा शिवराज पवार असे मृत हिंदु तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी कासीम पठाण याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

शाळेतील हुशार विद्यार्थिनी अशी पूजाची ओळख होती. तिने इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवून शाळेत दुसरा क्रमांक पटकावला होता. आधुनिक वैद्य होण्यासाठी तिने शहरातील नामांकित शिकवणीवर्गात प्रवेश घेतला होता.

पोलीस ठाण्यासमोर संतप्त नातेवाइकांसह जमला मोठा जमाव !

आत्महत्येचे वृत्त समजताच घाटी रुग्णालय परिसरात मृत तरुणीच्या संतप्त नातेवाइकांसह मोठा जमाव जमला होता. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी बेगमपुरा पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. त्याचसमवेत आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्याच्या मागणीसाठी जमावाने हर्सूल पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती.

पूजा इयत्ता ११ वीच्या विज्ञान शाखेत शिकत होती. शहरात एका खासगी शिकवणीवर्गामध्ये जात होती. राखी पौर्णिमेसाठी ती २ दिवसांपूर्वी गावाकडे गेली होती. मागील ८ महिन्यांपासून आरोपी कासीम तिला बळजोरी करत त्रास देत होता. ‘माझ्याशी बोलली नाहीस, तर तुझ्या भावाला जिवे मारीन’, अशी धमकी देत होता. (अशा प्रसंगी हिंदु तरुणींनी स्वसंरक्षण घेऊन धर्मांधांचा प्रतिकार करणे आवश्यक आहे. हिंदु तरुणींनी मनोबल वाढण्यासाठी प्रतिदिन धर्माचरण करणेही आवश्यक आहे. – संपादक) ही गोष्ट तिने तिच्या कुटुंबियांना सांगितली होती. तिच्या कुटुंबियांनी ४-५ वेळेला आरोपीला समजही दिली होती. (जिहादी धर्मांधांना केवळ समज देणे सोडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांत तक्रार करून पोलिसांवर दबाव आणणे आवश्यक ! – संपादक)

तरीही तो त्रास देत होता. त्यामुळे कंटाळलेल्या पूजाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. हा प्रकार नातेवाइकांच्या निदर्शनास आला. त्यांनी तिला तात्काळ विहिरीतून बाहेर काढत घाटी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. तेथील आधुनिक वैद्यांनी तिला मृत घोषित केले. पूजाच्या आत्महत्येमुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या नातेवाइकांनी या प्रकरणात ‘संबंधित आरोपीला तात्काळ अटक करावी’, अशी मागणी केली.

संपादकीय भूमिका

किती मुलींनी आत्महत्या केल्यावर आणि किती मुलींच्या हत्या झाल्यावर प्रशासन लव्ह जिहादविरोधी कायदा करणार ?