यापूर्वी धाड घालूनही पुनःपुन्हा होत आहे गोमांसाची विक्री !
बेलुरू (कर्नाटक) – येथील मुस्तफा गल्लीमध्ये अनधिकृतपणे गोमांस विकणार्या पशूवधगृहावर तहसीलदार एम्. ममता यांनी धाड घालून ४ टन गोमांस जप्त केले. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापूर्वीही नगरपालिकेने गोमांस विकणार्या या पशूवधगृहावर धाड घालून कठोर चेतावणी दिली होती, तसेच गुन्हा नोंदवला होता.‘हे प्रकरण गांभीर्याने घेतले जाईल आणि बेलुरूमध्ये अशा घटना घडू नये, यासाठी कारवाई केली जाईल’, अशी चेतावणी एम्. ममता यांनी दिली.
संपादकीय भूमिकासंबंधितांना अटक करून पशूवधगृह बंद का करत नाही ? |