‘११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी, गोवा येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव महर्षींच्या आज्ञेनुसार ‘ब्रह्मोत्सव’ म्हणून साजरा करण्यात आला. ९.६.२०२४ या दिवशी दुपारी ३ वाजता या सोहळ्याचे संगणकीय पुनःर्प्रक्षेपण दाखवण्यात येणार होते. आमच्या घरी तो सोहळा पहाण्यासाठी सर्व साधकांचे नियोजन केले होते.
१. ‘पावसाचा जोर वाढल्यास तांत्रिक अडचणी निर्माण होऊन साधक अमूल्य असा सोहळा पहाण्यापासून वंचित होतील’, याची काळजी वाटणे : ‘सोहळा चालू झाल्यानंतर साधारण १ घंट्याने पाऊस पडण्यास प्रारंभ झाला. त्या वेळी मला काळजी वाटू लागली. ‘पावसाचा जोर वाढला, तर पावसाच्या आवाजामुळे सर्व साधकांना नीट ऐकता येणार नाही. ‘इंटरनेट’ सुविधा संथ गतीने होऊन तांत्रिक अडचणी निर्माण होतील. सगळे साधक अमूल्य असा सोहळा पहाण्यापासून वंचित रहातील.
२. मी लगेचच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चरणी प्रार्थना केली. मी वरुणदेवता आणि वायुदेवता यांनाही प्रार्थना केली. काही क्षणांतच ‘पाऊस न्यून झाला’, असे माझ्या लक्षात आले.
३. मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि पंचमहाभूते यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
४. त्या वेळी मला वाटले, ‘प्रार्थना म्हणजे याचकभाव ! मी भगवंताच्या चरणी झोळी पसरून उभी आहे आणि प्रत्यक्ष भगवंत प्रार्थना ऐकत आहे. त्या वेळी कृतज्ञताभावातून माझ्या मनाला आनंद मिळाला.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेनेच ‘प्रार्थनेत असलेली व्याकुळता आणि कृतज्ञताभावातून मिळणारा आनंद’ या दोन्ही अवस्था मला अनुभवता आल्या’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे.’
– सौ. प्रीती नीलेश जोशी, लांजा, जिल्हा रत्नागिरी. (९.६.२०२४)
|