इस्रायलकडून शिकायला हवे !

इस्रायल देश जरी अपवादात्मक छोटा असला, तरी त्याचे भारताशी पुष्कळ साम्य आहे. तेथील १ कोटी लोकसंख्यैपकी जवळजवळ दोन तृतीयांश हे ‘ज्युडाईझम’चे (यहुदी) अनुयायी आहेत. आपल्या देशातही एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के लोक सनातन धर्म किंवा हिंदु धर्माचे अनुयायी आहेत. यहुदी आणि हिंदु धर्म हे दोन्ही धर्म अत्यंत प्राचीन आहेत, तरीही दोन्ही राष्ट्रे अधिकृतरित्या ‘निधर्मी’ (सेक्युलर) आहेत. इस्रायलमध्ये हिब्रू ही अधिकृत भाषा आहे की, जी प्राचीन भाषांपैकी एक आहे; परंतु भारतामध्ये जरी सर्व भाषा या संस्कृत भाषेतून निर्माण झाल्या असूनही तिला अधिकृत भाषा म्हटले जात नाही. एखादी भाषा टिकवणे आणि तिचा प्रसार करणे यांसाठी तिला राजसत्तेकडून संरक्षण पाहिजे. त्याखेरीज कोणतीही भाषा स्वतःच्या बळावर आहे तशीच रहात नाही.

इस्रायल देशाची राजधानी जेरुसलेम

१. इस्रायल आणि भारत येथील मुसलमानांमधील राष्ट्रप्रेमासंबंधीचा भेद

इस्रायलप्रमाणे आपल्या देशातही मुसलमानांचे प्रमाण १८ टक्के आहे; परंतु भारतात धर्मांतर केलेले मुसलमान आणि इस्रायलमधील मूळ अरबी मुसलमान यांच्यामध्ये लक्षणीय भेद आहे. इस्रायल लॅबेनॉन, पॅलेस्टाईन, सीरिया, इराण, इराक, येमेन या इस्लामी राष्ट्रांवर लष्करी कारवाई करत असूनही इस्रायलमधील मुसलमान त्याविषयी आरडाओरड करत नाहीत. याउलट भारतातील धर्मांतर झालेले मुसलमान ‘इस्लामिक राष्ट्रांमधील मुसलमानांवर बिगर मुसलमान असलेली शत्रूराष्ट्रे अन्याय करत आहेत’, असा आरोप करून अनावश्यकपणे ऊर बडवण्यात सहभागी होत आहेत. हे प्रमाण एवढ्यापर्यंत गेले आहे की, संसदेतील सदस्य असलेले भाग्यनगर (तेलंगाणा) येथील एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी हे संसदेमध्ये शपथ घेतांना उघडपणे ‘जय पॅलेस्टाईन’ म्हणतात. या वेळी ते ‘पॅलस्टाईनच्या ‘हमास’ या आतंकवादी गटाने ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी मेजवानीमध्ये सहभागी असलेल्या इस्रायली नागरिकांवर केलेले भयानक आक्रमण, तसेच पुरुष, महिला अन् मुले असे एकूण ३५० जणांना ओलीस ठेवणे’, हे सर्व सोयीस्करपणे विसरत आहेत. भारतातील लोकशाहीमधील तथाकथित विजेत्यांनी इस्रायली नागरिकांविषयी सहानुभूती दाखवण्यासंबंधी एकही शब्द उच्चारला नाही, हे प्रसंगानुरुप लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे इस्रायलमधील या निष्पाप लोकांवर झालेल्या भयानक आक्रमणाचा निषेध करणे हे बाजूलाच राहिले.

२. इस्लामच्या अनुयायांच्या वेशाआड पाप करण्यार्‍यांना चोख प्रत्युत्तर देणे आवश्यक !

अधिवक्ता डॉ. एच्.सी. उपाध्याय

इस्लामी राष्ट्रांनी वेढलेले असूनही गेल्या काही वर्षांत स्वातंत्र्य, सुसंवाद आणि धार्मिक सहनशीलता यांचा तारणहार असलेल्या इस्रायलची प्रशंसा केली पाहिजे. इस्रायलने जिहादी आणि आतंकवादी गटांशी असलेल्या लढ्यात कधीही हार मानलेली नाही. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, गैरइस्लामी राष्ट्रांनी एकत्र येऊन सर्व शक्तीनिशी सुसंस्कृत समाजाचा अपमान करणार्‍या या रानटी क्रूर आतंकवादी गटांशी लढा दिला पाहिजे.

थोडक्यात सांगायचे, म्हणजे मानवता वाचवायची असेल आणि शांतता अन् सुसंवाद यांविषयीच्या आचारांनी धर्मांधांच्या क्रौर्यावर विजय मिळवायचा असेल, तर मानवाच्या कल्याणासाठी कायद्याचे राज्य प्रस्थापित केले पाहिजे. आता वेळ निघून जाण्यापूर्वी सुसंस्कृत राष्ट्रांनी भक्कमपणे एकत्र येऊन इस्लामच्या अनुयायांच्या वेशाआड पाप करण्यार्‍यांना चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे. प्रेषित महंमद आणि कुराण यांच्या नावाखाली काही मुसलमानांमध्ये जहालवाद परसवण्यासाठी अर्धशिक्षित किंवा शिक्षित असलेले धार्मिक शिक्षण देणारे मौलाना अन् मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) मोठ्या प्रमाणात उत्तरदायी आहेत. प्रेषित महंमद आणि कुराण यांतील शिकवणीचा खरा अर्थ बहुतांश मुसलमान समाजापासून लपवला जात आहे; कारण इस्लामच्या रक्षणकर्त्यांना जर त्यातील मूलभूत तत्त्वे सांगितली, तर या भोळ्याभाबड्या, निष्पाप आणि गरीब मुसलमानांवरचे स्वतःचे वर्चस्व न्यून होईल, असे वाटते. विद्वानांच्या म्हणण्यानुसार मानवता, शांती, सहअस्तित्व, सुसंवाद आणि समाजाची भरभराट ही तत्त्वे इस्लाममधील मूलभूत तत्त्वे आहेत. जर इस्लामचे अनुकरण करण्यार्‍या बहुतांश लोकांना या मूलभूत तत्त्वांविषयी माहिती दिली, तर समाजामध्ये विसंवाद वाढवण्याविषयी असलेला स्वार्थी हेतू नष्ट होईल. हे करणे खरोखरच कठीण काम आहे; परंतु योग्य तर्‍हेने विचार करणार्‍या लोकांनी आणि राष्ट्रांनी हे केले पाहिजे. तोपर्यंत जगात शांतता आणि समृद्धी नांदण्यासाठी शांतताप्रिय राष्ट्रांनी भरकटलेल्या रानटी जिहादी शक्तींशी निकराची लढाई केली पाहिजे.

– अधिवक्ता (डॉ.) एच्.सी. उपाध्याय, भाग्यनगर, तेलंगाणा.