भारतात ‘लव्ह जिहाद’, ‘गोहत्या’ होऊनही त्यावर हिंदूंची प्रतिक्रिया येत नाही. भारतात प्रतिवर्षी ३ कोटी गोवंश कापला जातो; परंतु हिंदू यावर सामूहिकरित्या आवाज उठवत नाहीत. बहुसंख्य युवावर्गाला याच्याशी देणे-घेणे नाही. याचे कारण त्यांना धर्मबोध आणि शत्रूबोध नाही. हिंदु समाजही धर्मविहीन झाला आहे. आपल्या जाज्वल्य इतिहासाचा हिंदूंना गर्व नाही. आपल्या संतांचा अवमान होऊनही हिंदू गप्प आहेत. हिंदू केवळ अर्थ आणि काम यांमध्ये अडकले आहेत. भारतातील काही भागांमध्ये हिंदूंची लोकसंख्या झपाट्याने न्यून होत आहे. विभाजनानंतर पाकिस्तानमधील ५० लाख हिंदूंना मारण्यात आले. तेथील हिंदूंना १ सहस्र ४०० कोटी रुपयांची मालमत्ता सोडावी लागली. दुसरीकडे मात्र पाकिस्तानच्या निर्मितीनंतर भारतात आणखी १३-१४ पाकिस्तान होण्याच्या मार्गावर आहेत. भारत पुन्हा विभाजनाच्या उंबरठ्यावर आहे. स्वत:च्या संस्कृतीविषयीची हिंदूंमधील श्रद्धा वृद्धींगत व्हावी, यासाठी आम्ही मंदिरामध्ये दीप लावण्याची योजना चालू केली आहे. दुर्लक्षित मंदिरांमध्ये देवतांचे पूजन करून आम्ही दीप लावतो. हिमाचल प्रदेश राज्यातून आम्ही ही योजना चालू केली आहे.
– मीनाक्षी शरण, संस्थापक, अयोध्या फाऊंडेशन, मुंबई.