चंदगड येथे निवेदन
चंदगड (जिल्हा कोल्हापूर) – उरणमधील यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्या ‘लव्ह जिहाद्या’ला तात्काळ फाशी द्या आणि धारावी (मुंबई) येथे अरविंद वैश्य या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करणार्या धर्मांधांना तात्काळ अटक करा, या मागणीचे निवेदन हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने नायब तहसीलदार हेमंत कामत यांना देण्यात आले. या प्रसंगी श्रीराम सेना आणि हिंदुराष्ट्र सेना तालुकाध्यक्ष श्री. महांतेश देसाई, तालुका उपाध्यक्ष श्री. तुकाराम मरगाळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दयानंद पाटील यांसह अन्य कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.