१. सौ. पूर्णिमा कल्लूर, हुब्बळ्ळी
१ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन होताच मनाला हलकेपणा जाणवणे : सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे दर्शन झाल्या क्षणापासून घरी येईपर्यंत माझे मन हलके झाले होते. ‘माझ्या सर्व चुका गुरुदेवांनी त्यांच्या चरणी घेतल्या’, असे वाटून माझे मन निर्विचार झाले.
१ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी फुले अर्पण होत असतांना ‘स्वतःच त्यांच्या चरणी अर्पण झाले’, असे वाटणे : ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ फुले अर्पण करत असतांना ‘मी मलाच गुरुचरणी अर्पण केले आहे’, असे मला वाटत होते. मला सतत पुष्कळ चैतन्य जाणवून माझ्या अस्तित्वाची जाणीव होत नव्हती.’
२. श्री. विजय पुजार, राणेबेन्नुर
अ. ‘कार्यक्रमस्थळी प्रवेश केल्यावर साधकांचा तो सागर पाहून भावाश्रू दाटून आले.
आ. सनातन कुटुंबाचे सर्व सदस्य एकाच ठिकाणी पाहून हा भूलोकातील स्वर्ग आहे आणि ‘आम्ही सर्व साधक आनंदसागरात डुंबत आहोत’, असे मला वाटले.
इ. ‘सनातनचा प्रत्येक साधक म्हणजे गुरुदेवांचे रूपच आहे’, असे मला जाणवले.
ई. प्रत्येक क्षण आध्यात्मिक अनुभूती आणि आनंद यांनी ओतप्रोत भरला होता.
उ. गुरुदेव गुरुमातांसह (टीप) रथात सिंहासनारूढ होऊन आल्यावर नमस्कार मुद्रेत सतत नामस्मरण आणि प्रार्थना होऊन कृतज्ञता व्यक्त होत होत्या. (टीप – श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यासह)
ऊ. ‘ही वेळ आनंदमय असून ती संपू नये’, असे वाटत होते.
ए. एक क्षणही माझी दृष्टी रथ, रथारूढ गुरुदेव आणि गुरुमाता यांवरून दूर जात नव्हती.
ऐ. सोहळा संपल्यावर मी वाहनाजवळ आलो, तेव्हा पू. रमानंदअण्णा कर्नाटकातून आलेल्या प्रत्येक वाहनाजवळ जाऊन साधकांशी बोलत होते. ते पाहून माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि मला पू. रमानंदअण्णांविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
(सर्व सूत्रांचा दिनांक जून २०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |