१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दृष्टीक्षेपातून व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी लागणारी ऊर्जा अन् चैतन्य मिळणे
‘एकदा मी रामनाथी आश्रमात सेवेसाठी गेले असतांना मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. प.पू. गुरुदेव नमस्काराच्या मुद्रेत हात जोडून उपस्थित सर्व साधकांकडे पाहून स्मितहास्य करत होते. ‘ते ज्या दिशेला पहात होते, तिथून ते माझ्याकडेच पहात आहेत. त्यांचे लक्ष माझ्याकडे आहे’, असे मला जाणवत होते. त्यातून मला व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी लागणारी ऊर्जा अन् चैतन्य मिळाले.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यात सर्व देवता असून ‘मोक्षगुरुही तेच आहेत’,असे वाटणे
प.पू. गुरुदेव, तुम्हीच राम, तुम्हीच कृष्ण, तुम्हीच शिव आणि तुम्हीच दत्त आहात ! आम्हाला मोक्षाला नेणारे मोक्षगुरुही तुम्हीच आहात गुरुदेव ! तुमच्या चरणी भावपूर्ण वंदन !’
– सौ. प्रीती नीलेश जोशी, लांजा, जिल्हा रत्नागिरी.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |