नवी देहली – रेल्वे रुळावर सायकल, जिवंत कोंबडी, सिलिंडर, दगड आदी साहित्य ठेवून त्याच्यावरून रेल्वेगाडी गेल्यावर या वस्तूंची काय स्थिती होते, याचा व्हिडिओ बनवून तो यू ट्यूब चॅनलवरून प्रसारित करणार्या गुलजार शेख या यू ट्यूबरला (स्वतःच्या यू ट्यूब वाहिनीद्वारे व्हिडिओ अपलोड करणार्या व्यक्तीला) पोलिसांनी अटक केली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत ही माहिती दिली. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहिल्यानंतर सामाजिक माध्यमांतून गुलजार याला विरोध होऊन कारवाईची मागणी करण्यात येऊ लागली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
“Rail Jihadi” Gulzar arrested
रेल जिहादी गुलज़ार गिरफ़्तार
I assured you that Rail Jihadi won’t be spared by authorities @legalhindudef
Thank you @myogiadityanath @Uppolice @RailMinIndia @AshwiniVaishnaw https://t.co/oMTTc29Up0 pic.twitter.com/AytyZGZBy3
— Shehzad Jai Hind (Modi Ka Parivar) (@Shehzad_Ind) August 1, 2024
संपादकीय भूमिकाव्हिडिओ बनवण्याच्या नावाखाली रेल्वे अपघात घडवून शेकडो लोकांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचाच गुन्हा त्याच्यावर नोंदवून त्याला फाशी होण्यासाठीच सरकारने प्रयत्न केला पाहिजे ! |