गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) साधकांसाठी किती आणि काय काय करतात ?’, याचे वर्णन रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील बालसाधिका कु. देवांशी घिसे हिने या कवितेतून केले आहे.
प्रेमळ असे गुरु।
इतरांचा विचार करणारे गुरु।। धृ.।।
साधकांच्या साधनेची तळमळ असणारे गुरु।
साधकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आनंद देणारे गुरु।। १।।
साधकांच्या आजारपणात त्यांना।
धीर नि आधार देणारे अन् काळजी घेणारे गुरु।। २।।
कुणी चांगल्या गोष्टी केल्या।
तर कौतुक करणारे गुरु।। ३।।
कुणाला काही झाले तर।
त्याच्या पाठीशी सदैव रहाणारे गुरु।। ४।।
लहान मुलांच्या आनंदासाठी त्यांना।
चॉकलेट नि प्रसाद अन् भेटवस्तू देणारे गुरु।। ५।।
कुणी मायेत असतांना त्यांना।
साधनेचे महत्त्व पटवून देणारे गुरु।। ६।।
साधकांच्या मनावर साधनेचे।
संस्कार बिंबवणारे गुरु।। ७।।
कुणी दुःखी असतांना त्यांना।
धीर अन् आधार देणारे गुरु।। ८।।
स्वतः डॉक्टर असूनही सर्वांना।
साधनेचे अन् नामजपाचे महत्त्व सांगणारे गुरु।। ९।।
स्वतः आईबाबांसारखे प्रेम देणारे गुरु।
सर्वांचे त्रास स्वतःवर घेऊन त्यांना मुक्त करणारे गुरु।। १०।।
स्वतः वयस्कर असूनही।
स्वतःची कामे स्वतः करणारे गुरु।। ११।।
साधकांच्या साधनेच्या भल्यासाठी।
त्यांना ग्रंथ लिहून देणारे गुरु।। १२।।
– कु. देवांशी घिसे (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ५६ टक्के, वय १० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(१२.४.२०२४)