सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती           

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सौ. सुनीता थापा, डेहराडून  

१ अ. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) स्वतः भगवंताच्या रूपात असूनही ‘किती कृतज्ञताभावाने सर्वांना नमस्कार करत आहेत’, असे वाटणे : ‘गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) रथात बसून तेथे उपस्थित सर्वांना नमस्कार करत होते. तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती झाली. गुरुदेव स्वतः भगवंताच्या रूपात आहेत आणि तरीही ‘किती कृतज्ञताभावाने सर्वांना नमस्कार करत आहेत’, असे मला वाटत होते. त्यांच्या डोळ्यांमध्ये आणि मुखावर जे भाव होते, ते पाहून पुष्कळ भावजागृती झाली.’

२. सौ. मंजू गुप्ता, देहली (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६४ वर्षे) 

२ अ. ‘ब्रह्मोत्सव आहे’, असे समजल्यावर मनात सकारात्मक पालट अनुभवता येणे : ‘११.५.२०२३ या दिवशी ब्रह्मोत्सव आहे’, असे समजल्यानंतर माझ्या मनातील विचारांमध्ये सकारात्मक पालट अनुभवता आले. काही दिवसांपासूनच माझ्या मनात नकारात्मक विचार वाढले होते. हळूहळू मनात उत्साह वाढू लागला. मन कार्यक्रमाला जाण्यासाठी सिद्ध झाले.

२ आ. ब्रह्मोत्सवाचा सोहळा या भूलोकात होत नसून तेथे वैकुंठ लोकच अवतरला असून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आगमनामुळे ते स्थळ प्रकाशमय होणे, रथ सजीव झाल्याचे जाणवणे आणि जिथे तिन्ही मोक्षगुरूंची दृष्टी पडत असणे तेथील सर्वांचा उद्धार होत आहे’, असे अनुभवता येणे : ‘ब्रह्मोत्सवाचा सोहळा पहातांना प्रत्यक्ष मीही सहभाग घेतला आहे’, असे मला अनुभवता आले. ब्रह्मोत्सवाचा सोहळा या भूलोकात होत नसून ‘तेथे वैकुंठ लोकच अवतरले आहे’, असे वाटले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आगमनामुळे ते स्थळ प्रकाशमय होत गेले. रथ सजीव झाल्याचे जाणवत होते. रथात बसलेल्या तिन्ही मोक्षगुरूंकडून (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याकडून) चैतन्याचा प्रवाह साधकांकडे जात होता. ‘ज्या बाजूला तिन्ही मोक्षगुरूंची दृष्टी पडत होती. त्यांचा उद्धार होत आहे’, असे अनुभवता आले. ‘सर्व साधकांचे त्रास चैतन्याच्या प्रभावामुळे न्यून होत आहेत’, असे अनुभवता आले. संपूर्ण सोहळा पहातांना माझे मन निर्विचार होते. माझ्यावरील काळ्या शक्तीचे आवरण न्यून झाल्यामुळे शरीर आणि मन यांमध्ये हलकेपणा जाणवत होता.

२ इ. ब्रह्मोत्सवानंतर शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढली असल्याचे मला जाणवले. सेवा करण्यासाठी उत्साह वाटू लागला. सेवेचे चिंतन वाढले. गुरुकृपेने अजूनही उत्साह टिकून आहे.’

(सर्व सत्रांचा दिनांक १९.१२.२०२३)

(समाप्त)