काँग्रेस सरकारकडून मंदिरांच्या जीर्णोद्धारांसाठी ८५ कोटी रुपयांची तरतूद !

कर्नाटक राज्याचा अर्थसंकल्प

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने अर्थसंकल्प सादर केला आहे. यात राज्यातील मठांचा विकास आणि मंदिरांचा जीर्णोद्धार यांसाठी मुख्यमंत्री विशेष अनुदानांतर्गत ८५ कोटी रुपये, तसेच विविध समुदायांच्या विकास कार्यक्रमांतर्गत अतिरिक्त  ७० कोटी देण्यात आले आहेत.

अल्पसंख्यांकांच्या योजनांसाठी ५२ कोटी रुपये !

‘कर्नाटक अल्पसंख्यांक विकास निगम’च्या विविध योजनांची कार्यवाही (अंमलबजावणी) करण्यासाठी ५२ कोटी ५ लाख रुपये, तर कर्नाटक राज्य हज समितीच्या प्रशासकीय खर्च आणि हज भवनाच्या देखभालीसाठी अतिरिक्त दीड कोटी रुपये देण्यात आले आहेत. (देशात अल्पसंख्यांक म्हणजे मुसलमान, असेच चित्र निर्माण केले जाते आणि तसेच पाहिले जाते. ‘अल्पसंख्यांना पैसे दिले आणि हिंदूंना दिले नाही’, असे कुणी म्हणू नये; म्हणून हिंदूंना पैसे दिले, हे दाखवण्यासाठीच मंदिरांच्या जीर्णाद्धारांसाठी निधी घोषित केल्याचे दिसून येते ! यातील किती पैसे मंदिरांना प्रत्यक्षात मिळणार आहे ?, हाही प्रश्‍नच आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

हिंदूंसाठी आम्ही काहीतरी करत आहोत, असे दाखवण्याचा काँग्रेस सरकारचा हा प्रयत्न आहे. काँग्रेसला खरेच मंदिरांसाठी काही करायचे असेल, तर सर्वप्रथम मंदिरे सरकारीकरणातून मुक्त केली पाहिजे !