लोलक-परीक्षणाद्वारे घटकाची अचूक प्रभावळ मोजण्याची पद्धत

सौ. मधुरा कर्वे

वर्ष २०२१-२०२२ मध्ये ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाद्वारे चाचण्या करतांना काही घटकांच्या प्रभावळी २३०० मीटरपेक्षाही अधिक होत्या; पण जागा अपुरी पडत असल्याने त्या अचूक मोजता येत नव्हत्या. या प्रभावळी अचूक मोजण्यात येणार्‍या मर्यादा लक्षात घेऊन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने लोलक-परीक्षणाद्वारे म्हणजे लोलकाचा उपयोग करून त्या अचूक मोजण्यास आरंभ केले.

‘लोलकाने घटकाची अचूक प्रभावळ कशी मोजली जाते ?’, याविषयी सर्वांना कुतुहल असते. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे साधक लोलक-परीक्षण कसे करतात ? याची माहिती पुढे दिली आहे.

१० ते १०० आकड्यांचा तक्ता

१. लोलक-परीक्षण करणारा साधक सर्वप्रथम इष्टदेवतेला ‘माझ्याभोवती आणि लोलकाभोवती संरक्षक-कवच निर्माण होऊ दे’ अशी प्रार्थना करतो. त्यानंतर तो पुढील प्रश्न विचारतो.

प्रश्न १. मी लोलक-परीक्षण करू शकतो का?

प्रश्न २. लोलक-परीक्षण करण्यासाठी निवडलेले स्थळ आणि वेळ योग्य आहे का ?

लोलकाने दोन्ही प्रश्नांना होकार दर्शवल्यावर साधक लोलक-परीक्षण करण्यास आरंभ करतो.

२. लोलक-परीक्षण करण्यासाठी ज्याचे परीक्षण करायचे तो घटक किंवा त्याचे छायाचित्र आणि काही तक्ते यांची आवश्यकता असते. साधक घटकाची प्रभावळ मोजण्यासाठी त्यासमोर लोलक धरून काही प्रश्न विचारतो. या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी विविध प्रकारचे तक्ते उपयोग आणले जातात, उदा. ‘हो’ आणि ‘नाही’ यांचा तक्ता; ‘मीटर’ आणि ‘किलोमीटर’ यांचा तक्ता; आकड्यांचे तक्ते, उदा. १ ते १० आकड्यांचा तक्ता; ५,१०,५०,१०० इत्यादी संख्यांच्या पटीतील आकड्यांचे तक्ते; १ सहस्र ते १० सहस्र, १० सहस्र ते १ लक्ष, १ लक्ष ते १० लक्ष, १० लक्ष ते १०० लक्ष इत्यादी पटीतील आकड्यांचे तक्ते. यांपैकी आवश्यक त्या तक्त्यांचा उपयोग करून आणि आवश्यक ते प्रश्न विचारून साधक त्या घटकाची अचूक प्रभावळ मोजतो आणि ती नोंद करून ठेवतो.

३. लोलक-परीक्षण करून झाल्यावर साधक इष्टदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.७.२०२४)