Canada Temple Attack : कॅनडामध्‍ये पुन्‍हा एकदा खलिस्‍तान्‍यांकडून हिंदूंच्‍या मंदिराची तोडफोड !

कॅनडातील एडमंटन येथे स्‍वामीनारायण मंदिराची खलिस्‍तान्‍यांकडून तोडफोड

ओटावा (कॅनडा) – कॅनडातील एडमंटन येथे स्‍वामीनारायण मंदिराची खलिस्‍तान्‍यांकडून तोडफोड करण्‍यासह मंदिराच्‍या भिंतीवर चित्रे काढून ती विद्रूप करण्‍यात आली. ही घटना २२ जुलैला घडली. कॅनडातील विश्‍व हिंदु परिषदेने ‘एक्‍स’वर पोस्‍ट करून या घटनेची माहिती दिली. या घटनेचा निषेध करत कॅनडा सरकारकडे दोषींवर कारवाई करण्‍याची मागणीही विहिंपकडून करण्‍यात आली आहे. कॅनडामध्‍ये यापूर्वी अनेक मंदिरांना खलिस्‍तान्‍यांकडून लक्ष्य करण्‍यात आले आहे.

(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक) 

१. गेल्‍या वर्षी कॅनडातील मिसिसोंगा येथील श्रीराममंदिराची तोडफोड करून त्‍यावर भारतविरोधी घोषणा लिहिल्‍याची घटना घडली होती. या घटनेनंतर टोरंटो येथील भारताच्‍या वाणिज्‍य दूतावासाने या घटनेचा निषेध नोंदवला होता. तसेच दूतावासाने या प्रकरणातील गुन्‍हेगारांना कठोर शिक्षा देण्‍याची मागणी केली होती.

२. गेल्‍या वर्षी सप्‍टेंबरमध्‍ये टोरंटो येथील स्‍वामीनारायण मंदिराची तोडफोड करण्‍यात आली होती.

३. यावर्षी जानेवारीमध्‍ये ब्रॅम्‍प्‍टन येथील एका मंदिराची विटंबना करण्‍यात आली होती. या मंदिराच्‍या भिंतींवर भारतविरोधात घोषणा लिहिण्‍यात आल्‍या होत्‍या.

संपादकीय भूमिका

जिहादी आतंकवादी जे परदेशात करत नाहीत, ते खलिस्‍तानी करत आहेत. अशांचे नाक दाबण्‍यासाठी भारत सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !